Dharali Floods Video: डोंगराच्या कुशीत आणि भगीरथी नदीच्या काठावर वसलेली धराली एका घटनेनं उद्ध्वस्त झाली. ढगफुटी झाली एरवी संथ वाहणारे खीर गंगेच्या पात्रातून धरालीत विध्वस करणारा प्रचंड पाणी आणि गाळ वाहून आला. काही क्षणात धरातील टोलेजंग इमारती गाडल्या गेल्या. काही बहुमजली इमारतींची छतेच आता दिसत आहेत. याच धरालीतील ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोंगराच्या पायथ्याला आणि भगीरथी नदीच्या काठावर राहणाऱ्या धरालीतील लोकांना कधीही वाटलं नसेल की, अशा पद्धतीने त्यांनी उभी केलेली घरे जमीनदोस्त होतील. ढगफुटी झाली आणि धरावीतील बहुसंख्य घरे पाण्याने गिळली.
घरे दबली, उरले दगड-गोटे आणि गाळ
धरालीतील गाळाखाली दबले गेले आहेत. मातीचा हा भराव इतका आहे की, इथे काहीच नव्हते इतकं सपाट झालं आहे. सगळीकडे चिखल भरला गेला आणि मध्येच पाण्याचा प्रवाह वाहत आहे.
खीर गंगा नदीच्या पात्रातून पाण्याचा प्रवाह आता संथ झाला आहे. पण, जिथे ही नदी भागीरथीला मिळते तिथे सगळा गाळ, दगड-गोटे भरले आहेत. तिथे काही तासांपूर्वी घरे होती. रस्ते होते.
ढगफुटीनंतर धरालीतील व्हिडीओ
सध्या धरालीमध्ये भारतीय लष्कराचे जवान, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर लोक शोध व मदत कार्यात गुंतले आहेत. घटना घडली तेव्हा धरातील मध्ये २०० लोक होते, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या लोकांचा अजूनही शोध सुरूच आहे.