आरक्षणासाठी धनगर समाजाचा लढा

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:43+5:302015-02-21T00:49:43+5:30

नागपूर : आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज सहा दशकांपासून संघर्ष करीत आहे. सरकारने आता कुठे त्याची दखल घेतली. त्यामुळे कुणी आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नये, असे विनंतीवजा आवाहन धनगर युवक मंडळ, नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

Dhangar community fight for reservation | आरक्षणासाठी धनगर समाजाचा लढा

आरक्षणासाठी धनगर समाजाचा लढा

गपूर : आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज सहा दशकांपासून संघर्ष करीत आहे. सरकारने आता कुठे त्याची दखल घेतली. त्यामुळे कुणी आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नये, असे विनंतीवजा आवाहन धनगर युवक मंडळ, नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील आणि सचिव ॲड. एस. झेड. सरोदे यांनी आज सायंकाळी टिळक भवनात संयुक्त पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, तांत्रिक चुकीमुळे धनगर बांधव आरक्षणापासून दूर आहे. ही चूक मान्य करून राज्य सरकारने आता केंद्राकडे तसा अहवाल पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासनही दिले आहे. त्यावर काही विरोधी प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे धनगर बांधव अस्वस्थ आहे. धनगरांना आरक्षण लागू झाल्यास आदिवासी बांधवांच्या सवलतीवर कसलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे विरोध करण्याऐवजी धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेला नारायणराव खरबडे, दीपक अवताडे, नामदेवराव खाटके, शेषराव जंगले आदी उपस्थित होते.
----

Web Title: Dhangar community fight for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.