कर्ज थकबाकीप्रकरणी धनंजय मुंडेंना नोटीस
By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:35+5:302015-08-11T00:03:35+5:30

कर्ज थकबाकीप्रकरणी धनंजय मुंडेंना नोटीस
>बीड : कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना युनियन बँक ऑफ इंडियाने नोटीस बजावली आहे.नोटीशीत त्यांच्या मालमत्तेचा ऑनलाईन लिलाव केला जाणार असल्याचे नमूद केले आहे. मुंडे यांनी २०१३ मध्ये १६ लाख ८८ हजार ७९७ रूपये कर्ज घेतले होते तर त्यांच्या पत्नी राजश्री यांनी परळी तालुक्यातील मलथानपुर शिवारातील जमिनीवर २५ लाख २९ हजार ५८७ रूपये कर्ज उचलले होते. त्याची परतफेड करण्यासंदर्भात बँकेने वारंवार विनंत्या केल्या. परंतु त्यांनी एकही रूपयाची कर्जफेड केली नसल्याचे बँकेने सांगितले. ५ ऑगस्टला बँकेचे वसुली अधिकारी के. एस. राणोत यांनी धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नोटीस बजावली आहे. बदनामीसाठी षडयंत्रमाझ्या बदनामीचे हे षडयंत्र आहे. इतर कर्जबाजारी शेतकर्यांप्रमाणेच मी पण एक कर्जबाजारी शेतकरी आहे. अनेक वर्षांपासून या जमिनीतून उत्पन्न मिळत नाही. उलट मोठ्या प्रमाणात खर्च झाला. नापिकीमुळेच मी कर्जबाजारी झालो आहे. बँका व शासनाने शेतकर्यांची परिस्थिती समजून घ्यावी, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी नोटीशीबाबत बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)