शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारी पडला, तरीही मोदी भाषण करतच राहिले; काँग्रेसकडून 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 15:21 IST

राहुल गांधीच्या ओदिशातील व्हिडीओनंतर मोदींचा साडे पाच वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होण्याआधी विमानतळावर एक प्रसंग घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल गांधी भुवनेश्वर विमानतळावर असताना एक फोटोग्राफर तीन-साडेतीन फुटांवरुन पडला. त्यावेळी राहुल गांधी क्षणाचाही विलंब न करता त्याची विचारपूस करण्यासाठी धावून गेले. यानंतर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले.राहुल गांधी फोटोग्राफरची विचारपूस करण्यासाठी धावून गेले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ काँग्रेसकडून सोशल मीडियावर वेगानं शेअर केला जाऊ लागला. मोदी भाषण करताना त्यांच्या शेजारी असलेला एक पोलीस अधिकारी चक्कर येऊन खाली पडतो. मात्र तरीही मोदी त्यांचं भाषण थांबवत नाहीत. शेजारी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस या अधिकाऱ्याच्या मदतीसाठी धावतात. या दरम्यान मोदी मागे वळून पाहतात. मात्र तरीही भाषण सुरूच ठेवतात, असं दृश्य या व्हिडीओत दिसत आहे. लोकमतनं या व्हिडीओची खातरजमा केली असता, तो 15 ऑगस्ट 2013चा असल्याचं दिसून आलं. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करताना पोलीस महासंचालक अमिताभ पाठक चक्कर येऊन पडले. त्यावेळी मोदी त्यांच्यापासून अगदी काही फूट अंतरावर होते. मोदींचं भाषण सुरू होऊन अर्धा तास झाला, त्यावेळी पाठक कोसळले. त्यावेळी मोदींनी बाजूला पाहिलं. यानंतर व्यासपीठावरील इतर पोलीस अधिकारी पाठक यांच्या मदतीला धावले. त्यांनी पाठक यांना व्यासपीठावर खाली नेलं. यावेळीही मोदींनी मागे वळून पाहिलं. मात्र त्यांनी भाषण सुरुच ठेवलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसIndependence Dayस्वातंत्र्य दिवसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस