शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

'तुमचा हवाई वाहतुकीचा परवानाच रद्द करू'; DGCA चा एअर इंडियाला थेट इशारा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:19 IST

अहमदाबाद विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विमान कंपन्यांवर कडक कारवाई करत आहे.

DGCA on Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघानंतर एअर इंडिया विमान कंपनीला मोठा फटका बसताना दिसत आहे. या अपघातानंतर एअर इंडियांच्या विमानांबद्दल आणि उड्डाणांबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. अशातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला एक गंभीर इशारा दिला आहे. जर कंपनीच्या उड्डाण प्रक्रियेमध्ये अनियमितता सुरू राहिली तर एअरलाइनचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा तो रद्दही केला जाऊ शकतो. पायलट ड्युटी शेड्यूलिंग आणि देखरेखीमध्ये सतत गंभीर चूका आढळत असल्याने डीजीसीएकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एअर इंडियाविरोधात सध्या नागरी उड्डयन महासंचालनालयाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियावर वैमानिकांच्या फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात आली. डीजीसीएने कएअरलाइनच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचे आदेशही दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनात सहभागी असलेल्या पायल अरोरा यांचा समावेश होता.

मे महिन्यात एअर इंडियाच्या बंगळुरू-लंडनच्या दोन विमानांबद्दल तक्रारी आल्यानंतर कंपनीसाठी कठीण काळ सुरू झाला. या विमानांनी वैमानिकांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळ घेतला जे फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशनच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन होते. डीजीसीएने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि एअरलाइनच्य व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि सात दिवसांत उत्तर मागितले. तपासात क्रू शेड्युलिंगमध्ये मोठा निष्काळजीपणा झाल्याचे समोर आलं.

डीजीसीएच्या कडक कारवाईचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे अहमदाबाद येथे झालेला अपघात. त्या दिवशी एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना टेकऑफनंतर कोसळले. या अपघातात २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २७० ​​हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने एअर इंडियाच्या सुरक्षा पद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर डीजीसीएने एअरलाइनच्या प्रत्येक पैलूची बारकाईने चौकशी सुरू केली. २० जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डीजीसीएने २०२४ पासून आतापर्यंतच्या सर्व तपासांचे रेकॉर्ड मागितले.

डीजीसीएने एअर इंडियाच्या जुन्या अनियमिततांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये, एअर इंडियाच्या अंतर्गत ऑडिटमध्ये क्रू शेड्यूलिंगमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. याबाबत कळवूनही कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. चुकीच्या क्रू पेअरिंग, वैमानिकांना विश्रांती न देणे आणि परवाना नियमांकडे दुर्लक्ष करणे यासारख्या चूका समोर आल्या. डीजीसीएने याला सिस्टमिक फेल्युअर म्हणतकठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

दरम्यान, एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तात्काळ काढून टाकण्यास सांगितले. तसेच या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई सुरू करावी आणि १० दिवसांच्या आत डीजीसीएला अहवाल द्यावा. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांची नॉन-ऑपरेशनल पोस्टवर बदली करावी आणि त्यांना क्रू शेड्युलिंग संबंधित कोणत्याही पदावर काम करण्याची परवानगी देऊ नये, असं डीजसीएने सांगितलं आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना