AIR Aisa'वर DGCA ची मोठी कारवाई! वैमानिकांच्या प्रशिक्षणातील गंभीर चूक पकडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 05:05 PM2023-02-11T17:05:04+5:302023-02-11T17:05:11+5:30

Air Asia विरोधात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी Air Asia वर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

dgca imposes a fine of rs 20 lakh on air asia over lapses in pilot training | AIR Aisa'वर DGCA ची मोठी कारवाई! वैमानिकांच्या प्रशिक्षणातील गंभीर चूक पकडली

AIR Aisa'वर DGCA ची मोठी कारवाई! वैमानिकांच्या प्रशिक्षणातील गंभीर चूक पकडली

googlenewsNext

Air Asia विरोधात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी Air Asia वर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  वैमानिकांच्या कौशल्याच्या चाचणीदरम्यान एअर एशियाच्या वैमानिकांनी वेळापत्रकानुसार काही नियम पाळलेले नाहीत, असं डीजीसीएने म्हटले आहे. एअर एशियाच्या आठ नियुक्त परीक्षकांना त्यांच्या कामात निष्काळजीपणासाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नागरी विमान वाहतुकीच्या आवश्यक नियमांनुसार काम न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने केलेल्या तपासणीत एअरएशिया लिमिटेडने वैमानिकांच्या प्रशिक्षणावेळी निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार त्यांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. DGCA नागरी विमान वाहतूक नियमांनुसार कर्तव्ये पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर एशियाच्या प्रशिक्षण प्रमुखाला तीन महिन्यांसाठी त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय नामांकित आठ परीक्षकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पीएनबीचे लॉकर खोलताच किंचाळली तरुणी; लाखो रुपयांची हालत अशी की, मातीच झाली....

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित व्यवस्थापक, प्रशिक्षण प्रमुख आणि AirAsia च्या सर्व नियुक्त परीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.  त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये, असं यात म्हटले आहे. त्यांच्या लेखी उत्तरांची छाननी करून त्याआधारे कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची चूक अत्यंत धोकादायक मानली जाते. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करून देण्याची जबाबदारी वैमानिकांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या प्रशिक्षणात काही त्रुटी राहिल्यास प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने एअर एशियाविरोधात हे कठोर पाऊल उचलले आहे.

Web Title: dgca imposes a fine of rs 20 lakh on air asia over lapses in pilot training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.