शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:17 IST

अहमदाबाद विमान अपघातानंतर, डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या बोईंग विमानांची अतिरिक्त तपासणी आणि देखभाल करण्याचे निर्देश दिले.

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने  बोईंग ७८७-८/९ विमानांवरील सुरक्षा तपासणी वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ही नवीन सूचना १५ जून २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होणार आहे. उड्डाणापूर्वी डीजीसीएने अनेक महत्त्वाच्या तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात आतापापर्यंत २७४ लोकांचा मृत्यू झाला. यापैकी २४१ हे विमानातील प्रवासी होती. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी डीजीसीएने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर डीजीसीएने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. डीजीसीएने एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांच्या ताफ्याची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात, डीजीसीएने १५ जून २०२५ पासून विमान कंपनीला त्यांच्या सर्व बोईंग ७८७-८/९ विमानांच्या ताफ्यात कराव्या लागणाऱ्या तपासण्यांची यादी दिली.

एअर इंडियाच्या ७८७-८ आणि ७८७-९ ड्रीमलायनर विमानांच्या इंधन देखरेख, इंजिन नियंत्रण प्रणाली, हायड्रॉलिक प्रणाली, टेक-ऑफ पॅरामीटर्स आणि उड्डाण नियंत्रणांसाठी कसून तपासणी करावी लागणार आहे, असं डीजीसीएने म्हटले. ही विमाने जीई एरोस्पेसद्वारे उत्पादित जीएनएक्स इंजिनने सुसज्ज आहेत. एअर इंडियाकडे एकूण ३३ ड्रीमलायनर विमाने आहेत. त्यामध्ये २६ बोईंग ७८७-८ आणि ७ बोईंग ७८७-९ आहेत. या सर्व विमानांची अतिरिक्त तपासणी डीजीसीएच्या प्रादेशिक कार्यालयांच्या देखरेखीखाली केली जाईल.

केबिन एअर कॉम्प्रेसर, संबंधित प्रणाली, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणाली, इंजिन इंधन चालविणारे अ‍ॅक्च्युएटर्स, ऑईल सिस्टिट आणि हायड्रॉलिक प्रणालीची सेवाक्षमता आणि टेक-ऑफ पॅरामीटर्सची ऑपरेशनल चाचणी केली जाईल. हायड्रॉलिक सिस्टीम, इंजिन ऑइल सिस्टीम आणि फ्युएल अ‍ॅक्च्युएटरचे काम तपासले पाहिजे. पॉवर अ‍ॅश्युरन्स टेस्ट दोन आठवड्यांच्या आत पूर्ण करण्यात सांगितले आहेत. तसेच गेल्या १५ दिवसांत वारंवार नोंदवलेल्या समस्यांचा आढावा आणि त्याच्यावरील केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAirportविमानतळ