शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

महाकुंभात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास; योगी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:09 IST

योगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कुंभाच्या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले आणि संबंधितांना निलंबित करण्याचा इशाराही दिला. 

राजेंद्र कुमार

लखनौ : प्रयागराज येथील महाकुंभात पवित्र स्नानासाठी जात असलेल्या भाविकांना प्रचंड गोंधळ, वाहतूक कोंडी यांचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य प्रशासन वाहतूक कोंडी नसल्याचा दावा करत असले तरी प्रयागराज जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर भाविकांची हजारो वाहने उभी आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष मुख्यमंत्री योगींना लक्ष्य करत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची झडती घेतली.

स्नान करू इच्छिणाऱ्या भाविकांना तासनतास पायी चालत जावे लागत आहे. लोक रात्रभर रस्त्यावरील गाडीत झोपूनच पुढचा प्रवास करत आहेत. त्यामुळे टीकेचा भडीमार झाल्याने योगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कुंभाच्या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले आणि संबंधितांना निलंबित करण्याचा इशाराही दिला. 

भाविकांवर काळाचा घाला, ७ ठारकुंभमेळ्यातील भाविकांना घेऊन परतणाऱ्या मिनी बसची व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने मंगळवारी झालेल्या अपघातात ७ ठार तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणातील नागरिकांचा सामवेश आहे. सिमेंट घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हर टेक करण्याच्या नादात मिनी बसला धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे मिनी बसचा पुढील भागाचा चुराडा झाला आहे. 

गर्दी इतकी की ट्रेनवर केली दगडफेकजयनगरहून नवी दिल्लीला जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट ट्रेनवर सोमवारी समस्तीपूर आणि मधुबनी जंक्शनवर प्रयागराजला जाणाऱ्या जमावाने दगडफेक केली. ट्रेनचा एस३ कोच रिकामा न झाल्याने स्टेशनवर उभ्या असलेल्या अनियंत्रित जमावाने दगडफेक केली. यामुळे एसी थ्री कोचच्या काचा फुटल्या. तर, काही प्रवासी जखमीही झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग १५ वर अनेक किलोमीटरचा जाम आहे. 

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथ