शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या दानपेटीत चुकून पडला iPhone; त्यानंतर जे घडलं त्यानं भक्ताचं डोकंच चक्रावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 09:07 IST

पूजेनंतर मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकायला गेलेल्या दिनेश यांच्यासोबत हा प्रकार घडला.

चेन्नई - तामिळ सिनेमा पलयाथम्मनमध्ये एक महिलेकडून चुकून तिचं बाळ मंदिराच्या दानपेटीत पडतं त्यानंतर हे बाळ मंदिराची संपत्ती बनते या कथेभोवती सिनेमा चित्रिकरण होते. परंतु खऱ्या आयुष्यात चेन्नईजवळील थिरुपुरूरच्या अरुलामिगु कंदस्वामी मंदिरात असाच काही प्रकार समोर आला आहे. एक भक्ताच्या खिशातून मंदिराच्या दानपेटीत त्याचा आयफोन पडतो. सिनेमाप्रमाणे यातही मंदिराने आता हा आयफोन मंदिराची संपत्ती झाल्याचं सांगत तो परत देण्यास नकार दिला आहे.

विनायगपुरम येथे दिनेश नावाच्या भक्ताला शुक्रवारी रिकाम्या हाताने मंदिरातून परतावं लागले कारण दानपेटीत असलेली कुठलीही गोष्ट देवाची आहे असं सांगून मंदिर अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन परत देण्यास नकार दिला परंतु त्याला सिम कार्ड आणि फोनमधील डेटा परत देण्याची तयारी मंदिर प्रशासनाने दाखवली आहे. दिनेश अलीकडेच त्याच्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेला होता. पूजेनंतर मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकायला गेलेल्या दिनेश यांच्यासोबत हा प्रकार घडला. ते जेव्हा शर्टाच्या खिशातून पैसे काढत होते तेव्हा चुकून त्यांचा आयफोन दानपेटीत पडला. दानपेटी मोठी असल्याने त्यांना फोन परत काढणे शक्य झालं नाही.

घाबरलेल्या अवस्थेत भक्त दिनेशने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला मात्र दानपेटीत पडलेली वस्तू किंवा पैसे हे मंदिराची संपत्ती मानली जाते ती परता देता येऊ शकत नाही. त्याशिवाय प्रथा परंपरेनुसार २ महिन्यातून केवळ एकदाच ही दानपेटी उघडली जाते.  दिनेश यांनी याबाबत मंदिराच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली. मात्र २ महिन्यांनी जेव्हा ही दानपेटी उघडली गेली तेव्हा फोन घेण्यासाठी धावले तेव्हा प्रशासनाने त्यांना अडवून केवळ सिम आणि मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा तुम्ही घेऊ शकता. हा फोन मंदिराकडेच राहील असं स्पष्ट सांगितले.

दरम्यान, दिनेशने आधीच नवीन सिम घेतले होते तर फोन परत करण्याचा निर्णय मंदिर अधिकाऱ्यांवर सोडला होता. दानपेटीत पडलेली कुठलीही वस्तू मंदिर आणि देवाची मानली जाते, या परंपरेचे पालन केले जाईल. हा फोन आता मंदिराकडेच राहील. दानपेटीला लोखंडी कुंपणाने चांगले संरक्षित केले असल्याने त्यांनी तो फोन दान म्हणून टाकला आणि नंतर त्यांचा विचार बदलला की नाही हे आम्हाला स्पष्ट नाही असं मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी म्हटलं.  

टॅग्स :Templeमंदिर