शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 00:22 IST

 त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वेल्लूर -  त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तामिळनाडूमधील वेल्लूर येथे घडलेल्या या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. लेलिन यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्यानंतर आता तामिळनाडूमध्ये पेरियार यांचे पुतळे पुढील लक्ष्य असल्याचे वक्तव्य भाजपा नेते एच. राजा यांनी केल्यानंतर काही तासांतच हा प्रकार घडला आहे. पेरियार आंदोलनाचे प्रणेते पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार आज समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन व्यक्तींना अटक केली आहे. प्रसारमाध्यमांमधून येत असलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक भाजपाचा आणि सीपीआयच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. मोडतोडीमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला होता. या कार्यकर्त्यांनी काल दुपारी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले होते. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाला कम्युनिस्टांची प्रचंड भीती वाटत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची टीका मार्क्सवादी नेत्यांनी केली. तर हे कृत्य म्हणजे डाव्यांच्या दमनशाहीविरुद्ध असणारा लोकांचा रोष असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारत