शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

फडणवीस यांच्या हाती बिहार निवडणुकीची सूत्रे; भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:47 IST

भाजपा नेतृत्त्वाकडून फडणवीसांवर मोठी जबाबदारी

दिल्ली/ मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे.बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा असून जदयू, भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची प्रतिमा संयमी नेता अशी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू हा तेथे मोठा पक्ष आहे. अशा वेळी २४३ जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजपकडे घेताना फडणवीस तसेच बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा कस लागणार आहे.यानिमित्ताने फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फडणवीस यांच्या निकटस्थांनी सांगितले की, ही जबाबदारी केवळ बिहार निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात तूर्त अजिबात जाणार नाहीत.सुशांत प्रकरणाची किनारअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद बिहारमध्ये उमटत आहेत. मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील वादही यानिमित्ताने समोर आला आहे. बिहारी विरुद्ध मराठी असा रंगही दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी भाजपने मराठी नेत्यावर टाकली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत