शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Devendra Fadnavis Sonia Gandhi: "सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:57 IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज करण्यात आली चौकशी

Devendra Fadnavis Sonia Gandhi: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी चौकशीसाठी आज बोलवण्यात आले. सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून सुमारे २ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. या कारवाईचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. पण ही कारवाई राजकीय हेतुने प्रेरित नाही असा पुनरूच्चार भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( National Herald Case ED Enquiry )

फडणवीस काय म्हणाले?

"सोनिया गांधींची ईडी चौकशी याबद्दलची भूमिका भाजपाने वेळोवेळी स्पष्टपणे मांडलेली आहे. नॅशनल हेराल्ड केस संदर्भात ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांना फसवल्याचा आणि २ हजार कोटी रूपये खासगी मालकीच्या करण्याचा आरोप केला गेला आहे. म्हणून ही चौकशी सुरू आहे. कोणाला जर कुठल्याही चौकशीला सामोरे जावं लागत असेल तर त्यात वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही असं मला वाटतं. ही चौकशी जर सरकारच्या पुढाकाराने सुरू झाली असती तर त्यात राजकीय षडयंत्र आहे असं म्हणता आलं असतं. पण ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप नाही. ही चौकशी म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता आहे", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी आज बोलवण्यात आले होते. या आधी याच प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तब्बल पाच दिवस ईडी चौकशी करण्यात आली होती. आजही सोनिया गांधी यांना चौकशीला बोलावल्यानंतर राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. "देशातील जनतेचा आवाज जाहीरपणे दाबला जातोय. अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा नक्कीच विजय होईल. जीएसटी, महागाई, अग्निपथ, एजन्सींचा गैरवापर यावर चर्चा करायचं असल्यास सभागृह तहकूब केलं जातं. पण एक दिवस अहंकारावर सत्याचा नक्कीच विजय होईल", अशा शब्दांत राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी