तीर्थस्थळ शेगावचा विकास, म्हाडाला दिले १८ कोटी

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:35+5:302015-01-22T00:07:35+5:30

नागपूर : संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील पार्किंगसाठी निश्चित जागेवरील वस्तीच्या पुनर्वसनासाठी म्हाडाला १८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून म्हाडाला वस्तीतील नागरिकांसाठी घरे बांधून द्यायची आहेत. शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. त्यावर न्यायालयाने म्हाडाला पैसे मिळाल्यानंतर काय केले यासंदर्भात दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

The development of Shethana, 18 crores for MHADA | तीर्थस्थळ शेगावचा विकास, म्हाडाला दिले १८ कोटी

तीर्थस्थळ शेगावचा विकास, म्हाडाला दिले १८ कोटी

गपूर : संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील पार्किंगसाठी निश्चित जागेवरील वस्तीच्या पुनर्वसनासाठी म्हाडाला १८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून म्हाडाला वस्तीतील नागरिकांसाठी घरे बांधून द्यायची आहेत. शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. त्यावर न्यायालयाने म्हाडाला पैसे मिळाल्यानंतर काय केले यासंदर्भात दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार ११ जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत किती विकासकामे पूर्ण झाली, किती विकासकामे प्रगतीपथावर आहेत व किती विकासकामे करायची आहेत याचा फेरआढावा बैठकीत घेण्यात आला. यानंतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला. यासंदर्भात विस्तृत माहितीही न्यायालयासमक्ष सादर करण्यात आली.
---------------------------
चौकट.....
रेल्वेस्थानकावर दुसरा फुटओव्हर ब्रिज
संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक येत असल्यामुळे रेल्वेस्थानकावरील एकमेवर फुटओव्हर ब्रिज अपुरा पडतो. त्यावर भाविकांची कोंडी होते. यामुळे दुसरा फुटओव्हर ब्रिज बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. रेल्वेने दुसरा फुटओव्हर ब्रिज बांधण्याची तयारी दर्शविली आहे, पण खर्च शासनाकडून मागितला आहे. हा मुद्दा पुढील सुनावणीत विचारात घेण्यात येणार आहे.

Web Title: The development of Shethana, 18 crores for MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.