शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूककेंद्रित दृष्टिकोनाने शहरांचा विकास शक्य नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 08:57 IST

महापौरांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

गांधीनगर : निवडणूककेंद्रित दृष्टिकोन बाळगून शहरांचा विकास साधता येऊ शकत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींनी केवळ निवडणुका जिंकण्यापुरता विचार करू नये, असा सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपशासित महापालिकांच्या महापौरांना शहरांच्या सर्वांगीण विकासाची योजना तयार करण्याचे आवाहन केले. 

मोठ्या शहरांवरील भार कमी करण्यासाठी शहर विकास योजना, सॅटेलाईट शहरांची निर्मिती तसेच टायर-२ व टायर-३ शहरांच्या विकासावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी महापौरांना केले. गुजरातच्या गांधीनगर शहरात भाजपशासित शहरांच्या महापौरांची अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोनदिवसीय परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते. या परिषदेत १८ राज्यांतील भाजपशासित महापालिकांचे ११८ महापौर व उपमहापौर सहभागी झाले आहेत. सरकारी योजनांच्या गरीब लाभार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवा तसेच आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणावर काम करा, असे आवाहनही पंतप्रधानांनी महापौर आणि अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींना केले. अनेकवेळा शहरांसाठी फायदेशीर ठरू शकणारे निर्णय केवळ अशा निर्णयांमुळे निवडणुकीत नुकसान होईल, या भीतीपोटी घेतले जात नाहीत. तुम्ही निवडणूककेंद्रित दृष्टिकोन ठेवून तुमच्या शहराचा विकास करू शकत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींनी केवळ निवडणुका जिंकण्यापुरता विचार करू नये, असे पंतप्रधान म्हणाले. केवळ केंद्रावर न अवलंबून राहता राज्यांनी शहर विकास योजनांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या आठवणींना उजाळा देताना मोदी म्हणाले की, बस रॅपिड ट्रान्झीट प्रणाली, ॲप आधारित ॲटोरिक्षा सेवा आणि बहुआयामी वाहतूक प्रणाली यासारख्या अत्याधुनिक शहरी वाहतूक प्रणाली आणि सुविधा राबविण्यात तेव्हा गुजरात अन्य राज्यांहून पुढे होते. 

गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची तरतूद २ लाख कोटींवर२०१४ मध्ये भारतातील विविध शहरांतील मेट्रो रेल्वेचे जाळे २५० किलोमीटरहून कमी होते. आता ते वाढून ७५० कि.मी. झाले असून, आणखी १ हजार कि.मी.साठीचे काम सुरू आहे. आज देशभरात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्यात येत असून, आम्ही आतापर्यंत ७५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. शहरांसाठी नागरी गृहनिर्माण हे एक मोठे आव्हान आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत आम्ही आतापर्यंत गरिबांना १.२५ कोटी घरांचे वाटप केले आहे, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये गृहनिर्माण प्रकल्पांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद होती. आज ती वाढवून २ लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. यातून शहरातील गरिबांप्रतीची आमची बांधिलकी प्रदर्शित होते, असे ते म्हणाले.

गरिबांसोबत बसून त्यांचे म्हणणे कधी ऐकले का ?शहरातील गरिबांसोबत बसून तुम्ही त्यांच्या समस्या कधी ऐकल्या काय? योजनेची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने ती लोकांपर्यंत पोहोचली, असे मानून आपण चालतो. तुम्ही जेवढे गरीब लोकांना भेटाल, त्यांच्यासाठी काम कराल, त्याचा परतावा ते तुम्हाला बोनससह देतील. प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि दर्जाबाबत तडजोड करू नका, असे आवाहन मी तुम्हाला करतो, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाGujaratगुजरात