मोरभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:20+5:302015-02-20T01:10:20+5:30
मोरभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला

मोरभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला
म रभवन बसस्टॅण्डचा विकास रखडला एसटीचा दावा ठरला फोल : मुख्य सचिवांच्या बैठकीत होणार चर्चा नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी परिसरात असलेल्या मोरभवन बसस्टॅण्डचा विकास करण्याचा दावा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केला होता. परंतु वर्ष लोटूनसुद्धा मोरभवनातील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. दरम्यान, महापालिकेच्या बसेसला जागा उपलब्ध करून देण्याच्या चर्चेमध्ये या प्रस्तावाला पुन्हा एकदा थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे. सीताबर्डीसारख्या शहरातील प्रमुख भागात असूनही मोरभवन बसस्टॅण्डमध्ये सुविधांचा अभाव आहे. गेल्यावर्षी पावसात येथील सुरक्षा भिंत पडली होती. ती तशीच आहे. प्लॅटफॉर्मसुद्धा वाढवण्यात आलेले नाहीत. प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. राज्य परिवहन महामंडळ सुमारे एक कोटीच्या निधीतून मोरभवनचा विकास करणार होते. परंतु त्याचे कामच सुरू झालेले नाही. अधिकारिक सूत्रानुसार येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्य सचिव नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते या विषयावर बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत मोरभवनचा विकास होईल की अशाच अवस्थेत येथून गाड्या चालतील, यावर निर्णय घेतला जाईल. बॉक्स.. दुसरा मार्ग तयार केल्यास उत्तम मोरभवन येथून सध्या पूर्वीपेक्षा अधिक बसेस धावत आहेत. शहर बसेसला जागा देण्याअगोदर दुसरीकडे जागा घेण्यासह दुसरा मार्ग तयार केल्यास चांगले होईल. राजीव घाटोळे - विभागीय नियंत्रक, एसटी