जनतेचा विकास हाच ध्यास हवा : प्रदीप कंद
By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:13+5:302015-08-23T20:40:13+5:30
शिरसगाव काटा : राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून जनतेचा विकास हाच ध्यास ठेवला, तरच तुम्ही जनतेच्या मनात स्थान मिळवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. ते शिरसगाव काटा येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

जनतेचा विकास हाच ध्यास हवा : प्रदीप कंद
श रसगाव काटा : राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून जनतेचा विकास हाच ध्यास ठेवला, तरच तुम्ही जनतेच्या मनात स्थान मिळवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. ते शिरसगाव काटा येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. येथील जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे यांच्या जिल्हा परिषद निधीतून केलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंतर्गत रस्ते व सुमारे ४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन कंद यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे हे होते.या वेळी पाचर्णे म्हणाले, की सध्या शिरूर तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु डिंभा धरणातून घोडमध्ये, तसेच चासकमानचेही टेलपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी आमदारांकडे टँकरची मागणी केली. यावर त्वरित टँकरसाठी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव पाठवावेत, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, दादासाहेब फराटे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, पंचायत समिती सर्व शिक्षाअभियानाचे शाखा अभियंता अतुल पिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे, सरपंच मनीषा कोळपे, उपसरपंच मोहन धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी यांनी केले. मच्छिंद्र इंगळे यांनी आभार मानले.फोटो ओळ -: शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील आरोग्य उपकेंद्र व विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार बाबूराव पाचर्णे व जि.प.अध्यक्ष प्रदीप कंद व इतर मान्यवर.