हुडकेश्वरसाठी ५५ रुपये विकास शुल्क
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
नागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील अविकसित लेआऊ टच्या विकासासाठी प्रति चौ.फूट ५५ रुपये विकास शुल्क आकारण्यात येणार आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
हुडकेश्वरसाठी ५५ रुपये विकास शुल्क
नागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील अविकसित लेआऊ टच्या विकासासाठी प्रति चौ.फूट ५५ रुपये विकास शुल्क आकारण्यात येणार आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने शुल्कवाढीसदर्भात निर्णय न घेता तो सभागृहाकडे पाठविला होता. नागपूर सुधार प्रन्यास नियोजन प्राधिकरणापूर्वी व नगररचना नियोजन प्राधिकरण असताना विकासकांकडून कुठलाही करारनामा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या भागातील अभिन्यासातील गडर लाईन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज पुरवठा, रस्ते आदी विकास कामे झालेली नाही. अशा अभिन्यासातील भूखंडांवर ८३.०३ रुपये दराने शुल्क आकारण्याची शिफारस प्रशासनाने केली होती. याला प्रफुल्ल गुडधे यांनी विरोध दर्शविला. इतर सदस्यांनीही याला विरोध दर्शविल्याने प्रति चौ.फूट ५५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)चौकट...आयुक्तांकडे करणार चौकशीची मागणी मागील सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर न करता तीन अधिकाऱ्यांना मनपात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती क रण्याचा डाव विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी उधळून लावला. प्रवीण देशमुख यांची माहिती तंत्रज्ञ, अमित मिश्रा यांची पर्यावरण अधिकारी तर संदीप लोखंडे यांची जनआरोग्य अभियंता पदावर नियुक्ती केली जाणार होती. हा प्रस्ताव मागील सभेत मंजूर झाला नसतानाही इतिवृत्तात मंजूर दर्शविण्यात आला होता. हा ठराव रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. यात चूक झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. परंतु ही गंभीर बाब आहे. यात कुणाचे हितसंबंध आहेत. ते पुढे येण्याची गरज असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.