शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:17 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन अर्थात मनरेगा नाव बदलण्यासह अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करणारे 'विकसित भारत-जी राम ...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन अर्थात मनरेगा नाव बदलण्यासह अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करणारे 'विकसित भारत-जी राम जी' विधेयक आज लोकसभेत प्रचंड गदारोळात मंजूर करण्याद आले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक पटलावर ठेवले होते. दरम्यान, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कागदाचे तुकडे भिरकावल्याने सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

भ्रष्टाचाराला चाप - दरम्यान, विधेयकाचे समर्थन करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मनरेगा योजना भ्रष्टाचाराचा अड्डा बनली होती. नवीन बदलांमुळे या योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होण्यास मोठी मदत होईल. राज्य सरकारांचा सहभाग वाढवून ही योजना अधिक प्रभावी केली जाणार आहे. महात्मा गांधींच्या नावाच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले, "रामराज्य हे तर बापूंचेच स्वप्न होते. बापू आजही आपल्या सर्वांसोबत आहेत. यामुळे त्यांचे नाव हटवण्याचा किंवा अपमान करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही."

हे महात्मा गांधींच्या अहिंसेच्या धोरणाविरुद्ध -दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी विरोधकांना अहिंसेची आठवणही करून देत, "विधेयकाची प्रत फाडणे हे महात्मा गांधींच्या अहिंसेच्या धोरणाविरुद्ध आहे." असे म्हणत शिवराज सिंह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या विधेयकावर कडाडून टीका करताना, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, "हे विधेयक म्हणजे मनरेगा योजना संपवण्याचा एक मोठा कट आहे." याशिवाय, एवढ्या महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला.

दरम्यान, सभागृहात विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून भिरकावल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "आपण सभागृहात जनतेचे मुद्दे मांडायला हवेत. गदारोळ केल्याने आणि विधेयकाची प्रत फाडून फेकल्याने, प्रश्न सुटणार नाही." अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले.

काय आहे 'व्हीबी- जी राम जी' योजना - हा नवीन कायदा मनरेगाप्रमाणेच रोजगाराची हमी देतो. मात्र, यात काही मोठे बदलही करण्यात आले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, या कायद्यांतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवसांच्या मजुरीच्या कामाची हमी दिली जाईल. मनरेगामध्ये ही मर्यादा केवळ १०० दिवसांची होती. हा रोजगार अशा कुटुंबांना मिळेल ज्यांचे प्रौढ सदस्य कोणत्याही विशेष कौशल्याशिवाय काम करण्यास तयार असतील.

असा आहे कायद्याचा मुख्यउद्देश -VB-G RAM G चा उद्देश केवळ रोजगार देणे नाही, तर ग्रामीण भागात शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करणे असाही आहे. यासाठी चार प्रमुख क्षेत्रांमध्ये काम केले जाईल:- जलसुरक्षेसाठी पाण्याशी संबंधित कामे.- रस्ते, पूल आणि सामुदायिक सभागृहे यांसारख्या मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा.- रोजगार आणि उपजीविकेशी संबंधित संरचना, जसे की  कृषी साहाय्य.- नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याशी संबंधित कामे.

या सर्व कामांतून निर्माण होणाऱ्या मालमत्तांना 'विकसित भारत नॅशनल रुरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टेक'मध्ये जोडले जाईल, यामुळे ग्रामीण विकासाचे एक एकात्मिक मॉडेल तयार होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Developed India Bill Passed Amidst Uproar; Opposition Tears Copy!

Web Summary : The 'Developed India-Ji Ram Ji' bill, amending MNREGA, passed in Lok Sabha amidst opposition protests. Agriculture Minister defends it as anti-corruption, while Congress criticizes it as undermining MNREGA. The speaker condemned the act of tearing the bill copy.
टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी