देवानंद श्िंांदे यांचा विदयापीठात सत्कार
By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
देवानंद शिंदे यांचा विद्यापीठात सत्कार

देवानंद श्िंांदे यांचा विदयापीठात सत्कार
द वानंद शिंदे यांचा विद्यापीठात सत्कारऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापक व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवानंद शिंदे यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नियुक्ती झाल्याबद्दल विद्यापीठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, आय क्वॅकचे संचालक डॉ. वि.ल. धारूरकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझहरुद्दीन, परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. वाल्मीक सरवदे आदींची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आणि आता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळाली. या दोन्ही विद्यापीठांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे डॉ. शिंदे म्हणाले. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सध्या जामनगरमध्ये एका परिषदेसाठी गेले आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र, लवकरच त्यांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात येईल, असे डॉ. काळे म्हणाले. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. मोराळे यांनी आभार मानले. कॅप्शनशिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा सत्कार करताना डॉ. के.व्ही. काळे. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.