रायसोनी पतसंस्थेविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्धार

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

ठेवीदारांचा जिल्हा मेळावा : २० टक्के टोकन पद्धती अमान्य

The determination of filing cases against the Raisoni Credit Society | रायसोनी पतसंस्थेविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्धार

रायसोनी पतसंस्थेविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्धार

वीदारांचा जिल्हा मेळावा : २० टक्के टोकन पद्धती अमान्य
नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेने ठेवी परत न केल्यास प्रत्येक शाखेच्या ठिकाणी पतसंस्थेविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा निर्धार जिल्‘ातील ठेवीदारांनी जिल्हा मेळाव्यात केला़ तसेच पतसंस्थेतर्फे २० टक्के रक्कम परत करण्यासाठी असलेली टोकन पद्धत अमान्य करीत ५० टक्के रक्कम तातडीने देण्याची मागणीही यावेळी ठेवीदारांनी केली़ बीएचआर ठेवीदारांच्या राज्य समन्वय समितीचा नाशिक जिल्हा मेळावा विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नाशकात झाला त्यावेळी ठेवीदारांनी हा निर्धार केला़
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था गेल्या सहा महिन्यांपासून ठेवीदारांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ करीत असून, राज्यभरातील २६४ शाखांही बंद केल्या आहेत. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. पतसंस्थेने ठेवी परत न केल्यास शाखांच्या ठिकाणी ठेवीदारांमार्फत पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा निर्धार या मेळाव्यात ठेवीदारांनी केला़ पतसंस्थेत १३०० कोटी रु पयांच्या ठेवी, १ हजार ४८० कोटींचे कर्ज येणे बाकी, तर सुमारे १८० कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती खोटी असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
रायसोनी पतसंस्थेने आतापर्यंत केवळ ७१ ठेवीदारांना १ कोटी ३६ लाख रु पयांच्या ठेवी परत दिल्या; मात्र पतसंस्थेचे सुमारे २६ हजार ठेवीदार आहेत. त्यामुळे या सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर त्यांच्या ठेवी द्याव्यात, अशी मागणीही या मेळाव्यात करण्यात आली. जिल्‘ातील ठेवीदारांच्या न्यायासाठी जिल्हा समन्वय समितीची स्थापनाही यावेळी करण्यात आली. त्यामध्ये निफाड येथील अनंतराव दाते, घोटी येथील चंद्रकांत खडमकर आणि एका महिला सदस्याची नियुक्ती करण्यात आली़ या समितीची येत्या २८ तारखेला बैठक होणार असून, त्यामध्ये पुढील भूमिका मांडण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The determination of filing cases against the Raisoni Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.