मदर डेअरीच्या दुधात सापडले डिटर्जंट
By Admin | Updated: June 16, 2015 19:01 IST2015-06-16T18:38:55+5:302015-06-16T19:01:16+5:30
नोव्हेंबर २०१४ साली मदर डेअरी दुधाच्या दोन पिशव्या घेण्यात आल्या, त्यापैकी एका पिशवीमध्ये डिटर्जंट अढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राम नरेश यादव यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले आहे.

मदर डेअरीच्या दुधात सापडले डिटर्जंट
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - मदर डेअरी या दुग्ध उत्पादक कंपनीच्या दुधामध्ये कपडे धुण्याचे डिटर्जंट सापडले आहे.
आग्र्यापासून ७० कि.मी अंतरावर असलेल्या बाह या ठिकाणाहून नोव्हेंबर २०१४ साली मदर डेरी दुधाच्या दोन पिशव्या घेण्यात आल्या, त्यापैकी एका पिशवीमध्ये डिटर्जंट अढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राम नरेश यादव यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले आहे. या दुधाचे नमुने लखनऊ येथे चाचणी करता पाठवण्यात आले होते. दोन्ही पिशव्यांतील नमुने तपासले असता ते निकृष्ट दर्जाचे अढळून आले आहेत.
या प्रकरणी मदर डेअरीच्या अधिका-यांना विचारले असता त्यांनी चुकून आमच्या उत्पादनाला लक्ष केले जात असल्याचे म्हटले आहे. मदर डेअरीचे बिझनेस हेड संदीप घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅकींग व वितरणापूर्वी दूधाच्या चार मुख्य चाचण्या घेतल्या जातात, तर दुध विक्रीकरता आलेल्या टँकरना २३ चाचण्या पार केल्यावरच त्यांचे दूध पुढील प्रक्रियेसाठी घेतले जाते. तसेच विक्रीकरता आलेल्या दूधाच्या टँकरमध्ये आम्हाला अनेकदा तेल, पाणी, युरीया इत्यादी पदार्थ अढळल्यास आम्ही त्या दूध विक्रेत्यांकडून दूध विकत घेत नसल्याचे घोष यांनी सांगितले आहे. तसेच जे दूध विकत घेतले जाते त्यातील प्रत्येक टँकरची १०० टक्के चाचणी घेतली जात असल्याचेही घोष यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यादव यांनी दिलेल्या माहितीमुसार लखनऊ व कोलकाता येथे चाचणीकरता पाठवलेल्या मदर डेअरीच्या नमुन्यांमध्ये दोष अढळले आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये आम्ही १० टँकरमधील दूध निकृष्ट असल्याने परत पाठवले होते व त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नसल्याचे घोष यांनी सांगितले आहे.