गिरडच्या वाळू तस्करावर एमपीडीएची कारवाई स्थानबद्ध : राज्यातील पहिली कारवाई जळगावात
By Admin | Updated: March 17, 2016 00:53 IST2016-03-17T00:53:25+5:302016-03-17T00:53:25+5:30
जळगाव-भडगाव तालुक्यातील गिरड येथील वाळु तस्कर नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्यावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली. नीलेश याला स्थानबद्ध करीत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गिरडच्या वाळू तस्करावर एमपीडीएची कारवाई स्थानबद्ध : राज्यातील पहिली कारवाई जळगावात
ज गाव-भडगाव तालुक्यातील गिरड येथील वाळु तस्कर नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्यावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली. नीलेश याला स्थानबद्ध करीत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी वाळू तस्करांना आळा घालण्यासाठी एम.पी.डी.ए. कायदा १९८१ मध्ये सुधारणा करण्याबाबत भर दिला होता. काय आहेत आरोप ? देसले याच्याविरुद्ध गिरणा नदीपात्रातून रात्री अपरात्री गौण खनिज, वाळुची ट्रक व ट्रॅक्टरच्या साहाय्याने चोरी करणे, ट्रक मध्ये वाळु भरुन नाशिक व औरंगाबाद येथे ठेकेदारांना विकणे, शासकीय अधिकारी- कर्मचार्यांवर हल्ला करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे या स्वरुपाचे भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत.चार लाख ३२ हजारांचा दंडत्याच्यावर भडगाव तहसीलदारांनी दहा वेळा दंडात्मक कारवाई करीत चार लाख ३२ हजार ६५० रुपये दंड वसुली केली आहे. त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी या कारवाईशी संबधितांचे जबाब नोंदविले होते. काय आहे एमपीडीए कायदामहाराष्ट्र झोपडपी दादा, हातभीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियम सन १९८१ (महाराष्ट्राचा कायदा क्रमांक ५५ सन १९८१) (सुधारणा) अधिनियम २०१५ (एम.पी.डी.ए.) आहे. या कायद्यात सुधारणा केल्यानंतर वाळु तस्कर या शब्दाचा समावेश केला. हा बदल महाराष्ट्र शासन राजपत्रात २९ जानेवारी २०१६ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार ही कारवाई जिल्हाधिकारी यांनी केली आहे.