तीन महिन्यांतील दौऱ्यांचा तपशील
By Admin | Updated: February 13, 2017 00:36 IST2017-02-13T00:36:44+5:302017-02-13T00:36:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ््या सहकारी मंत्र्यांना त्यांनी गेल्या तीन महिन्यांत विदेश दौऱ्यांसह केलेल्या दौऱ्यांचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.

तीन महिन्यांतील दौऱ्यांचा तपशील
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्या सहकारी मंत्र्यांना त्यांनी गेल्या तीन महिन्यांत विदेश दौऱ्यांसह केलेल्या दौऱ्यांचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
या मंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे महत्त्व लोकांमध्ये जाऊन पटवून दिले आहे का आणि सरकारच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी इतर काही पुढाकार घेतला आहे का हे जाणून घेण्यासाठी ही माहिती मोदी यांनी मागितली आहे, असे सूत्रांनी सांगितले. नुकत्याच मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोदी यांनी मंत्र्यांना हा आदेश दिला. हा तपशील सोमवारी सादर करायचा आहे. ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे या कामाच्या समन्वयाची जबाबदारी आहे.
विदेश दौऱ्यासह इतर सगळ््या दौऱ्यांची माहिती किंवा दौरा नव्हता तर मग ते दिल्लीत कार्यालयात होते याचा गेल्या तीन महिन्यांचा तपशील सादर करण्यास सगळ््या मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.
कामाचा समतोलही तपासणार
मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघाशिवाय इतरत्र जाऊन सरकारने घेतलेल्या पुढाकाराची माहिती सांगितली का, हे माहीत करून घेण्यासाठी अहवाल मागवण्याची ही कल्पना समोर आली. मंत्री त्यांची जबाबदारी आणि मतदारसंघातील काम यात समतोल ठेवतात की नाही, हेही पाहिले जाईल.