नक्षल प्रभावित भागात असूनही UPSC परीक्षेत मिळवला 99वा क्रमांक
By Admin | Updated: June 1, 2017 13:58 IST2017-06-01T13:58:10+5:302017-06-01T13:58:10+5:30
नक्षलवाद प्रभावित ठिकाणांपैकी एक असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील एका तरुणीने युपीएससी परीक्षेत 99 वा क्रमांक मिळवला आहे

नक्षल प्रभावित भागात असूनही UPSC परीक्षेत मिळवला 99वा क्रमांक
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 1 - देशात नक्षलवाद प्रभावित ठिकाणांपैकी एक असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील एका तरुणीने युपीएससी परीक्षेत 99 वा क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत नम्रताने घवघशीत यश मिळवत 99 वा क्रमाक पटकावला आहे. के पी एस भिलाई शाळेत शिकलेल्या नम्रता जैनने भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी मिळवलेली आहे. तिचे वडिल जवाहरलाल जैन एक व्यवसायिक असून आई किरण गृहिणी आहे.
नम्रताने युपीएससीची परिक्षा देण्याची ही दुसरी वेळ होती. प्राथमिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नम्रकाने दंतेवाडा जिल्हा प्रशासनातर्फे चालवण्यात येणा-या एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता. यामुळे नम्रताला खूप मदत मिळाली. दंतेवाडा जिल्हा प्रशासन प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी गेल्या चार वर्षांपासून कोचिंग सेंटर चालवत आहे.
जपान दौ-यावर गेलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी नम्रताचं कौतूक करत शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रताने मिळवलेलं यश जिल्ह्यातील इतर तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात प्रथम आली आहे. देशभरातून १,०९९ जण उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली आहे.
विश्वांजली गायकवाड देशात ११वी आली असून, स्वप्निल खरे देशात ४३वा आला आहे. विश्वांजली दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाली असून, तिला परराष्ट्र सेवेत जायचे आहे. याशिवाय स्वप्निल रवींद्र पाटील (५५), भाग्यश्री दिलीप विसपुते (१०३), प्रांजली लहेनसिंग पाटील (१२४), सूरज अनंता जाधव (१५१), स्नेहल सुधाकर लोखंडे (१८४), अनुज मिलिंद तारे (१८९), विदेह खरे (२०५), राहुल नामदेव धोटे (२०९), अंकिता धाकरे (२११), योगेश तुकाराम भारसट (२१५), श्रद्धा पांडे (२१९), किरण खरे (२२१), स्वप्निल थोरात (६००), अभिषेक टाले (८७७) हे राज्यातील विद्यार्थी चमकले आहेत़