शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! 'या' राज्यातील जनतेचा कौल भाजपला; पण मुख्यमंत्रिपदी हवाय काँग्रेस नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 08:56 IST

काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटीची लढत; मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्याला सर्वाधिक पसंती

देहरादून: पुढील वर्षी ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पुढील वर्षी होणारी निवडणूक २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. त्याआधारे मतदारांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षभरात राज्यानं तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागा आहेत. बहुमतासाठी ३६ जागा जिंकण्याची गरज आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला ३६ ते ४० जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ३० ते ३४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला ० ते २ जागा मिळू शकतात.

उत्तराखंडमध्ये भाजपला ४१ टक्के मतदान होईल असा अंदाज आहे. तर काँग्रेसला ३६ टक्के मतं मिळू शकतात. याशिवाय आपला १२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्ष आणि उमेदवारांना ११ टक्के मतं मिळू शकतील.

मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती?गेल्या वर्षभरात उत्तराखंडनं तीन मुख्यमंत्री पाहिले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप नेतृत्त्वानं सरकारचा चेहरा बदलला. विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीच पदावर कायम राहावं, असं २८ टक्के जणांना वाटतं. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं ३१ टक्के जनतेला वाटतं. तर अनिल बलुनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा जावी, असं १८ टक्के लोकांना वाटतं.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस