बंदी असतानाही दारू पिणा-या ७ जणांना बिहारमध्ये अटक
By Admin | Updated: April 27, 2016 11:32 IST2016-04-27T11:31:03+5:302016-04-27T11:32:40+5:30
संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू करण्यात आलेली असतानाही राज्यात अद्याप काही ठिकाणी चोरीछुपे दारू प्यायली जात असून पाटणा येथे दारू पिणा-या ७ जणांना अटक करण्यात आली.

बंदी असतानाही दारू पिणा-या ७ जणांना बिहारमध्ये अटक
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २७ - संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू करण्यात आलेली असतानाही राज्यात अद्याप काही ठिकाणी चोरीछुपे दारू प्यायली जात असून पाटणा येथे दारू पिणा-या ७ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी पानाश हॉटेलमधन अटक केली.
हे नागरिक पाटणा येथील एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आले होते, त्यानंतर ते पानाश हॉटेलमध्ये दारू पिण्यास गेले. राज्यात दारूबंदी असतानाही काही जण दारू पित असल्याचे वृत्त मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन ७ जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून दारूच्या काही बाटल्याही जप्त केल्या.
संपूर्ण बिहारमध्ये एप्रिल महिन्यापासून दारूबंदी लागू करण्यात आल्याने अनेक नागरिक दारूअभावी कासावीस झाले आहेत. हीच कडक दारूबंदी दोन जणांच्या जीवावरही बेतली तर काही नागरिकांना दारू न मिळाल्याने बराच त्रास झाला. अनेकांच्या शरीराला कंप सुटला तर काहीजण बेशुद्धही पडले.