देशप्रेम माझ्या रक्तात - राहुल गांधी

By Admin | Updated: February 18, 2016 13:45 IST2016-02-18T13:40:41+5:302016-02-18T13:45:01+5:30

देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या ह्दयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले.

Deshprem in my blood - Rahul Gandhi | देशप्रेम माझ्या रक्तात - राहुल गांधी

देशप्रेम माझ्या रक्तात - राहुल गांधी

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या ह्दयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 
जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील घडामोडींवरुन सुरु असलेल्या वादा प्रकरणी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. जर कोणी आपल्या देशाचा अपमान करत असेल तर, त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, पण त्यासाठी संपूर्ण विद्यापीठाला बदनाम करणे योग्य नाही असे राहुल गांधी म्हणाले. 
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ त्यांची विचारसरणी विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही तसे होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांच्या कल्पनांमुळे आज देशाची उन्नती झाली आहे. त्यांच्यावर विचारसरणी लादण्याचा देशाला फायदा होणार नाही असे राहुल गांधी म्हणाले. 
पत्रकारांना सर्वांसमक्ष मारहाण होते आणि पोलिस फक्त बघत रहातात. यामुळे संपूर्ण जगभरात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे असे राहुल म्हणाले. राहुल गांधी यांनी जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे समर्थन केल्याबद्दल भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. 
राहुल गांधींना देश हित आणि देश विरोधातला फरक समजत नाही अशी बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. 
 

Web Title: Deshprem in my blood - Rahul Gandhi