देश-परदेश लालू आंबे
By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:12+5:302015-06-06T00:11:12+5:30
लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क

देश-परदेश लालू आंबे
ल ची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्कलालूप्रसाद यादव: झाडे मी लावली होतीपाटणा: बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असणार्या झाडांचे फळे कोणी घ्यायची यावरुन जितनराम मांझी आणि नितीशकुमार यांच्यामध्ये चाललेल्या वादात आणखी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. या बंगल्याच्या बागेतील फळे खाण्याचा पहिला अधिकार माझा व माझी पत्नी राबडीदेवी यांचाच आहे, कारण ती झाडे मी लावली आहेत असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी या वादामध्ये प्रवेश केला आहे.लिची और आम के पेड पर मेरा और राबडीका हक है, हमने ही वहाँ पेड लगाये थे, असे सांगत लालू प्रसाद यांनी त्या फळांवर हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरी मांझी यांनी १, अणे मार्ग हा बंगला सोडलेला नाही. त्यामुळे, या बंगल्याच्या बागेतील झाडांची फळे त्यांना मिळू नयेत यासाठी नितिशकुमार यांनी झाडांची राखण करण्यासाठी पोलीस शिपायांची नेमणूक केली आहे. त्यावरुनच हा वाद सुरु झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रभावी असणारे महादलित कार्ड खेळत नितीशकुमार यांनी मांझी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण आधी केवळ प्यादे वाटणारे मांझी नितीशकुमार यांच्यावरच चाल करून गेल्यावर त्यांना हटविण्यात आले. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी जितनराम मांझी व नितिश यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.चौकट:फळझाडांची मुळे कुठवर?वरवर बालिश वाटणार्या या वादाचा संबंध बिहारच्या आगामी निवडणुकांमुळे तापत चाललेल्या राजकारणाशी आहे. लिची, आंब्याच्या या वादात भाजपानेही प्रवेश केला आहे. भाजपा आणि जितनराम मांझी यांनी नितिशकुमार यांनी आपल्या कृत्यातून महादलितांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. नितीश यांनी मी आवाम(जनता) ची काळजी करतो तर मांझी आम (आंबे)ची काळजी करत बसले आहेत असा टोमणा मारला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकले असले तरी त्यांचे खरे मनोमिलन अद्याप झालेले नाही. आता लोहियांचे हे शिष्य फळांसाठी असेच भांडत बसतात का समाजवादी तत्वाला जागून फळे वाटून खातात ते पाहता येईल.