जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मीर पूरग्रस्तांची वणवण
By Admin | Updated: September 18, 2014 02:07 IST2014-09-18T02:07:49+5:302014-09-18T02:07:49+5:30
अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.

जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मीर पूरग्रस्तांची वणवण
श्रीनगर : अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे. आधी अस्मानी व आता सुलतानी संकटाचा सामना करीत असलेले हे नागरिक अन्नधान्यासाठी दारोदार फिरत असून त्यांच्या पदरी निराशा येते आहे.
श्रीनगरच्या पादशाही बाग येथील रहिवासी गुलाम रसूल हे आपल्या विभागाकरिता अन्नधान्याची मागणी घेऊन सदर ठाण्यात गेले असता त्यांना बडगाम जिल्ह्यातील शेखूपुरा येथे जाण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपासून ते अन्नधान्यासाठी चकरा मारीत आहेत; पण त्यांना अद्याप हाती काहीही लागलेले नाही.
येथील पोलीस ठाण्यांमध्ये धान्यच आलेले नाही व जेथे ते आले आहे तेथे त्याच्या वाटपाची कोणतीच सोय नसल्याने ते कसे काय
देणार, असा प्रश्न येथील एका
वरिष्ठ पोलीस अधिका:यांने
उपस्थित केला आहे. किंबहुना
या आपत्तीत ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांचे काम इतके प्रचंड असताना पोलीस अन्नधान्य वाटपाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले आहे.
याखेरीज पोलीस ठाण्यांमध्ये हे धान्य साठविण्याची पुरेशी जागा व सोयही नाही. त्यामुळे आमच्याकडे येणारे धान्य आम्ही स्थानिक प्रशासनाकडे पाठवून देण्याची व्यवस्था करणार आहोत, असे ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)
4येथे उभारण्यात आलेल्या विविध मदत शिबिरातील अधिकारी नागरिकांना अन्नधान्य घेण्याकरिता जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवीत आहेत. मात्र, पोलीस अधिका:यांकडे वितरणासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ते नागरिकांना रिकाम्या हाती परत पाठवू लागले आहेत. अन्नधान्यामध्ये सर्वात जास्त मागणी तांदळाची केली जात आहे.