नवी दिल्ली/पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही अज्ञात व्यक्ती अपमानास्पद भाषा वापरत आहेत. या प्रकरणासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच जबाबदार धरले आहे. शिवीगाळ करण्याच्या या राजकारणाला बिहारची जनता सडेतोड उत्तर देईल असे भाजपने म्हटले आहे. मोदींच्या आईबद्दल काढलेल्या अपशब्दांबद्दल भाजप नेत्यांनी गुरुवारी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मोदींच्या आईचा अवमान करण्यात आला तो प्रकार दरभंगा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात घडल्याचे सांगण्यात आले. याच ठिकाणहून मतदार यात्रेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली होती. काँग्रेस आता शिव्यागाळ करणारा पक्ष झाला आहे.
'संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींचीच'गांधी कुटुंब सत्तेवर येऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आता गलिच्छ भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे असा आरोप भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. दरभंगामधील कार्यक्रमात मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेसाठी जे शब्द वापरण्यात आले, त्याचे संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींची आहे.
"संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींचीच'गांधी कुटुंब सत्तेवर येऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आता गलिच्छ भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे असा आरोप भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. दरभंगामधील कार्यक्रमात मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेसाठी जे शब्द वापरण्यात आले, त्याचे संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींची आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी आपल्या भाषणांमध्ये मोर्दीचा एकेरी उल्लेख करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता काही लोक त्याप्रमाणेच वागू लागले आहेत. संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींकडून आम्हाला माफीची अपेक्षा नाही. पंतप्रधानांबद्दल तुम्ही अपशब्द वापरत आहात. पण हा प्रकार लोकांना आवडलेला नाही. नाही. बिहारमधील जनता याचे नक्की उत्तर देईल.
मतदारयादीतून गरीब, मागासवर्गीयांना वगळले - राहुल गांधीबिहारच्या मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ लाख लोकांमध्ये बहुसंख्य लोक गरीब आणि मागासवर्गीय आहेत असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. मतदार अधिकार यात्रेदरम्यान सीतामढी येथे एका सभेत त्यांनी सांगितले की, बिहारची जनता भाजप आणि निवडणूक आयोगाला मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याची मुभा देणार नाही. भाजप, निवडणूक आयोगाच्या कृत्यांचा आम्ही पर्दाफाश केला आहे. त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्येही मत चोरण्याचा प्रयत्न केला होता.