शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब...; बोट दाखवत धनखड बरसले अन् सस्पेंड केलं! राज्यसभेत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 14:55 IST

तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला.

मी डेरेक ओ ब्रायन यांचे नाव घेत आहे. मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब सभागृह सोडा... असे म्हणत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड रागाने उभे राहिले आणि म्हणाले, 'आपण काय करत आहात? मिस्टर डेरेक ओ ब्रायन आपण विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे. मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब सभागृहातून बाहेर जा.' 

तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला. अखेर सभापती भडकले आणि बोट दाखवत उभे राहिले. काल लोकसभेत झालेल्या सुरक्षेतील चुकीसंदर्भात चर्चा करण्याची विरोधी पक्षांच्या सदस्यांची इच्छा होती.

यानंतर, काही वेळातच सभापती धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन (Derek O Brien Suspend) यांना या सत्राच्या उरलेल्या कालावधीसाठी सस्पेंड केले. त्यांच्यावर, राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. यावर सभापती म्हणाले, ते वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत राहिले. त्यांनी खुर्चीचा अपमान केला.

डेरेक यांनी नेमके काय केले? - यापूर्वी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे काही बोलायला लागले, तेवढ्यात सभापती म्हणाले, संसदेतील सदस्य असे करत आहे, आपण याची कल्पना करू शकता? हा लाजीरवाणा प्रकार आहे. मात्र, सभापती नेमके कशामुळे एवढे संतापले, हे स्पष्ट झालेले नाही. वेलमध्ये डेरेक घोषणाबाजी करताना दिसून आले. ते दोन्ही हातांनी इशारा करत बोलत होते. सभापती म्हणाले माझी मान शर्मेने झुकली. काही तरी (ऐक्शन) व्हायला हवे. काही सदस्यांना सवयच झाली आहे. आपण याला परवानगी द्याल का? असे म्हणताना धनखड यांचा इशारा खर्गेंकडे होता.

तत्काळ चेम्बरमध्ये बोलावलं अन्... -शेवटी, हे प्रकरण मी अत्यंत गांभीर्याने घेतले आहे, असे म्हणत धनखड यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करत विरोधी पक्षाचे नेते आणि सभागृह नेते यांना ताबडतोब (10 मिनिटांच्या आत) आपल्या चेम्बरमध्ये बोलावले. सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. याच पद्धतीने आज लोकसभेतही गदारोळ दिसून आला. यानंतर लोकसभेचे कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. येथेही विरोधी पक्षाचे नेते सुरक्षिततेसंदर्भात चर्चेची मागणी करत होते.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदTrinamool Congressतृणमूल काँग्रेस