राजेंद्र कुमार लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य शनिवारी एका मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावले.
कौशांबीला जाण्यासाठी मौर्य यांचे हेलिकॉप्टर सकाळी ११:३० वाजता मार्टिनियर ग्राउंडवरून निघाले. उड्डाणानंतर दहा मिनिटांनी अंदाजे २००० फूट उंचीवर असताना, तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टरमधून धुराचे लोट येऊ लागले. पायलटने तात्काळ अमौसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्याची ही चौथी वेळ आहे.
सर्व सहा जण सुरक्षित
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह एकूण सहा जण हेलिकॉप्टरमध्ये होते. सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. नंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दुसऱ्या हेलिकॉप्टरने कौशांबीला रवाना झाले.
नागरी विमान वाहतूक संचालक इशान प्रताप सिंह यांनी हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Web Summary : Deputy CM Keshav Maurya's helicopter made an emergency landing near Lucknow due to a technical fault shortly after takeoff. All six occupants, including Maurya, are safe. An inquiry has been ordered into the incident.
Web Summary : उपमुख्यमंत्री केशव मौर्य का हेलीकॉप्टर तकनीकी खराबी के कारण लखनऊ के पास आपातकालीन उतरा। मौर्य सहित सभी छह लोग सुरक्षित हैं। घटना की जांच के आदेश दिए गए हैं।