सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने ठेवीदारांमध्ये निराशा

By Admin | Updated: October 18, 2016 00:42 IST2016-10-18T00:42:41+5:302016-10-18T00:42:41+5:30

जळगाव- जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिरात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवी देण्यात दाखविलेल्या हतबलतेबाबत ठेवीदारांनी जनसंग्राम संघटनेच्या सोमवारी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या बैठकीत निराशा व्यक्त केली.

Depression among the depositors by the co-minister's statement | सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने ठेवीदारांमध्ये निराशा

सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने ठेवीदारांमध्ये निराशा

गाव- जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिरात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवी देण्यात दाखविलेल्या हतबलतेबाबत ठेवीदारांनी जनसंग्राम संघटनेच्या सोमवारी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या बैठकीत निराशा व्यक्त केली.
संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ठेवीदारांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच सहकार राज्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी यशवंत कन्हेर,अनुप पानपाटील,मिलिंद तायडे, भारती चौधरी, शिवराम चौधरी, तुकाराम राऊत, चैतन्य बोरोले, सुधाकर वाणी, सुकलाल कोल्हे, डॉ.दिलीप पाटील, मयूरी नेमाडे,धनराज सूर्यवंशी यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.

Web Title: Depression among the depositors by the co-minister's statement