‘सहकार शिरोमणी’च्या बगॅसच्या डेपोला आग
By Admin | Updated: December 8, 2015 01:52 IST2015-12-08T01:52:29+5:302015-12-08T01:52:29+5:30
07पंड02

‘सहकार शिरोमणी’च्या बगॅसच्या डेपोला आग
07 ंड02सहकार शिरोमणी कारखान्याच्या बगॅस डेपोला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी.पंढरपूर : भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला आग लागून 1100 मे. टन बगॅस जळून खाक झाला. यामध्ये कारखान्याचे सुमारे 23 लाखांचे नुकसान झाले आहे.कारखान्याच्या 2015-16 मध्ये उत्पादित झालेल्या बेल्ड बगॅसचा कारखान्यालगतच्या खुल्या जागेत डेपो लावण्यात आला होता. रविवारी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान अचानक बगॅसला आग लागली. ही घटना लक्षात येताच कारखान्याचे सुरक्षा जवान व कर्मचार्यांनी कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेमार्फत आग आटोक्यात आणण्याचा प्रय} केला. यानंतर र्शी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.