जामनेर बीडीओंची विभागीय चौकशी
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:27+5:302016-02-05T00:33:27+5:30
जळगाव- घरकूल योजनेत निम्मेपेक्षा कमी लक्ष्यांक केल्याने जामनेर येथील गटविकास अधिकारी (बीडीओ) एकनाथ साळुंके यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जि.प.तील आढावा बैठकीत दिले.

जामनेर बीडीओंची विभागीय चौकशी
ज गाव- घरकूल योजनेत निम्मेपेक्षा कमी लक्ष्यांक केल्याने जामनेर येथील गटविकास अधिकारी (बीडीओ) एकनाथ साळुंके यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जि.प.तील आढावा बैठकीत दिले. जामनेरात रमाई आवास, इंदिरा आवास आदी योजनांसंबंधी प्रगती नाही. यातच आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत व्यवस्थित स्पष्टीकरण देण्यासही गटविकास अधिकारी साळुंके असमर्थ ठरले. त्यावर मागील काळातही साळुंके यांनी कामात प्रगती दाखविलेली नाही. सुधारणा नाही. त्यांना एकदा संधी दिली, पुन्हा ती दिली जाणार नाही. साळुंके यांच्याबाबत दोषारोप दाखल करा. त्यांची विभागीय चौकशी सुरू करा, असे आदेश डवले यांनी दिले. तसेच कार्यालयात वरिष्ठांना सहकार्य न करणे, कामात लक्ष नसणे, दीर्घकालीन सुीवर जाणे आदी कारणांमुळे चाळीसगाव येथील सहायक गटविकास अधिकारी यांचे अधिकार काढण्याचे आदेशही डवले यांनी दिले. शाळा गुणवत्ता, ग्रा.पं.कर निर्धारण, वनराई व साठवण बंधार्यांच्या कामातील संथगती आदी कारणांवरून आयुक्त डवले व इतर अधिकार्यांनी अधिकार्यांची खरडपी काढली.