दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी
By Admin | Updated: May 7, 2014 02:17 IST2014-05-06T19:40:53+5:302014-05-07T02:17:27+5:30
दोन गटात हाणामारीप्रकरणी तीन युवकांना अटक करून बेदम मारहाण केल्याचा आरोप असलेल्या दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी
नवी दिल्ली : दोन गटात हाणामारीप्रकरणी तीन युवकांना अटक करून बेदम मारहाण केल्याचा आरोप असलेल्या दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण दिल्लीच्या आर.के. पुरम पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक मनोजकुमार, कॉन्स्टेबल मोहितकुमार आणि कॉन्स्टेबल परमवीर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, चार युवकांना कथित मारहाण करणार्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.
एकता विहारमध्ये रविवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी चार युवकांना अटक करून बेदम मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर आहे. आरोपी पोलिसांना पोलीस लाईनमध्ये पाठविण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे, असे एक पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल.
दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री प्रदीप, सलीम, नोनी आणि साजन यांना अटक केली. हे सर्व विशीतील युवक आहेत.
(वृत्तसंस्था)