शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 17:11 IST

एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर आपल्या आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.  देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशातील विविध ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र याच दरम्यान काही घटना समोर येत आहेत अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये घडली आहे. 

कोरोनाच्या संकटात रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर आपल्या आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्णांना घेऊन गेल्यावर स्ट्रेचरवरून नेण्यासाठी पैसे मागितले जातात. मात्र ते न दिल्यामुळे एका महिलेला तिच्या लहान मुलासह स्ट्रेचर ओढावा लागला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिंदू यादव असं या महिलेचं नाव आहे. बिंदू यांच्या साठ वर्षीय वडिलांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या हात-पायांना दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हात आणि पायांना फॅक्चर झाले आहे. वॉर्डमधून ड्रेसिंग करून घेण्यासाठी त्यांना जावे लागते. मात्र याच वेळी स्टेचर खेचण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पैशाची मागणी करतात. गरीब असल्याने आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी आणि माझा चार वर्षाचा मुलगा स्ट्रेचर ओढतो अशी माहिती महिलेने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बिहारच्या सिवान जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली. रुग्णालयाबाहेर एक महिला भर पावसात कित्येक तास जमिनीवर पडून होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या धक्कादायक घटनेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर ही घटना समोर आली रुग्णालयाबाहेर जमिनीवर पडून असलेल्या या महिलेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही घटना वेगाने पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. तिची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 11 लाखांचा टप्पा केला पार

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल