देवळाली कॅम्प जमीन फसवुणकीतील संशयितांना कोठडी
By Admin | Updated: April 27, 2016 00:06 IST2016-04-26T23:20:01+5:302016-04-27T00:06:18+5:30
नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल असलेल्या शेतजमीन हस्तांतरण गुन्ात पोलिसांनी अंकुश अरुण पवार (रा़जुने नाशिक) व नितीन भास्कर अहेर (रा़औरंगाबाद रोड, पंचवटी) या दोन संशयितांना अटक केली आहे़ या दोघांनाही मंगळवारी (दि़२६) नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

देवळाली कॅम्प जमीन फसवुणकीतील संशयितांना कोठडी
नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल असलेल्या शेतजमीन हस्तांतरण गुन्ात पोलिसांनी अंकुश अरुण पवार (रा़जुने नाशिक) व नितीन भास्कर अहेर (रा़औरंगाबाद रोड, पंचवटी) या दोन संशयितांना अटक केली आहे़ या दोघांनाही मंगळवारी (दि़२६) नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प परिसरात परवीन फरजीन यांची शेतजमीन आहे़ त्यांनी मृत्यूपूर्वी या शेतजमिनीची व संपत्तीच्या विल्हेवाटीबाबत मृत्युपत्र करून ते रजिस्टरही केले़ यानंतर नोटरी वकील ॲड़ उदय शिंदे यांच्याकडे नोटरी करण्यात आलेल्या मृत्युपत्रात ही जमीन पुष्पा नवले नावाच्या महिलेच्या लाभात सर्व जमीन करून दिल्याचे म्हटले होते़ त्यानुसार नवले यांनी देवळाली तलाठी कार्यालयात नावे लावण्यासाठी अर्ज केला होता़
मात्र, फरजीन यांचे अमेरिकेतील नातेवाईक हतोश मुकादम यांनी नवले यांचे नाव लावण्यास हरकत घेतली, तर नवले यांनी कब्जा करताना तेथील सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली होती़ या सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नवलेंसह त्यांच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल आहे़ दरम्यान, याबाबत खोटे मृत्यूपत्र तयार करून फसवणूक केल्याची फिर्याद हतोष यांनी पोलिसांत दिली होती़ यामध्ये पोलिसांनी तपास करून पवार व अहेर या दोघांना अटक केली़ (प्रतिनिधी)