शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण : शेकडो वर्षांचा समतेचा लढा हीच ‘सबका साथ’ची प्रेरणा - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:37 IST

संत आणि महान क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या  पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

यदु जोशी - 

हैदराबाद : स्वातंत्र्याचा लढा हा सत्तेसाठी नव्हे तर समतेसाठीही होता. त्याआधी श्री रामानुजाचार्य यांच्यासारख्या महान विभूतींनी सामाजिक समतेचे केलेले कृतिशील आचरण हीच स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा बनली आणि आज आपल्या सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास... असा संकल्प सोडला आहे. त्यामागची प्रेरणादेखील तीच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.संत आणि महान क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या  पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी तेलंगणच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन, केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, रामानुजाचार्य संस्थानचे प्रमुख एचएच चिन्ना जियार स्वामी  आदी उपस्थित होते. आजारी असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर व रामानुजाचार्य पुतळा अनावरण समारंभाला जाऊ शकले नाहीत. पंतप्रधान म्हणाले की, वाईट प्रथा रूढ होतात तेव्हा समाजसुधारणांसाठी कोणीतरी महापुरुष पुढे येतो, हा आपला इतिहास आहे. त्या काळात अशा सुधारकांना विरोध झाला, तरी नंतर त्यांचा स्वीकार होतो आणि सन्मानही मिळतो. चुकीच्या मार्गाने समाजाला नेणाऱ्यांना समाज मान्यता देत नाही, असा टोला त्यांनी हाणला. एचएच चिन्ना जियार स्वामी म्हणाले की, रामानुजाचार्य यांनी एक हजार वर्षे रुजवलेली शिकवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १ हजार कोटी रुपये जनसहभागातून गोळा करून हा प्रकल्प उभारला  आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणाBJPभाजपा