शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 06:34 IST

घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

जबलपूर (मध्य प्रदेश) : लग्नानंतर लग्नाची कर्तव्ये पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच आहे. घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पत्नीने लग्नाची पूर्तता करण्यास नकार दिला आणि २००६ मध्ये लग्न झाल्यापासून शारीरिक जवळीक नाकारली, या कारणास्तव न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने ३ जानेवारी रोजी एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला. “विवाहपूर्ती न करणे आणि शारीरिक जवळीक नाकारणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे,” असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

२०११ मध्ये, त्या व्यक्तीने घटस्फोटासाठी भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. २०१४ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, अनेक प्रसंगी महिलेने लग्नपूर्ती करण्यास आणि तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. कोणत्याही शारीरिक अक्षमतेशिवाय किंवा वैध कारणाशिवाय एकतर्फी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे हे मानसिक क्रूरता ठरू शकते.

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पत्नीने लग्नाची कर्तव्ये पार न पाडणे  हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही, हा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश चुकीचा आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

पत्नी म्हणाली, माझे प्रियकरासोबत लग्न लावून द्या... पुरुषाने दाखल केलेल्या अपिलानुसार, जुलै २००६ मध्ये त्याचे लग्न झाले. तथापि, त्याच्या पत्नीने आपले लग्न बळजबरीने लावले गेले, असा दावा करीत त्याच्यासोबत राहण्यास आणि लग्नपूर्ती करण्यास नकार दिला.आपले दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, असे सांगत पत्नीने त्यांना एकत्र आणण्याची विनंती पतीकडे केली. त्यानंतर पती त्याच महिन्यात कामासाठी अमेरिकेला निघून गेला आणि सप्टेंबरमध्ये ती महिला तिच्या माहेरी राहायला गेली आणि परत आलीच नाही.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालय