लग्नास दिला नकार, प्रेयसीने कापून टाकलं गुप्तांग

By Admin | Updated: June 23, 2017 22:20 IST2017-06-23T22:20:32+5:302017-06-23T22:20:32+5:30

लग्नास नकार दिल्यानंतर 23 वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Denial of marriage | लग्नास दिला नकार, प्रेयसीने कापून टाकलं गुप्तांग

लग्नास दिला नकार, प्रेयसीने कापून टाकलं गुप्तांग

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - लग्नास नकार दिल्यानंतर 23 वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित 35 वर्षीय तरुणाला संजय गांधी मेमोरिअल रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण रवीवर त्याच्या प्रेयसीने बुधवारी रात्री मंगोलपुरी येथे राहत्या घरी हल्ला केला.  
 
रवी आणि त्याची प्रेयसी गेल्या चार वर्षांपासून एकत्र होते. रवीला तरुणीच्या नातेवाईकांनी घरी बोलावलं होतं. रवी गेला असता त्यांनी लग्नाची बोलणी सुरु केली. मात्र आपलं कुटुंब लग्नासाठी संमती देणार नाही सांगत रवीने टाळाटाळ करत लग्नास नकार दिला. 
 
पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "प्रेयसी त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली, आणि सेक्स करायला सांगू लागली". रवीने सेक्स करण्यास नकार दिला असता प्रेयसीला प्रंचड राग आला, आणि रागाच्या भरात तिने किचनमध्ये जाऊन चाकू आणला आणि त्याचं गुप्तांग कापून टाकलं. 
 
रवीने सांगितलं आहे की, घटना घडली तेव्हा तिचा भाऊ आणि वहिनी तिथे उपस्थित होते. त्यांनी बचाव करण्याचा कोणताच प्रयत्न केला नसल्याचा आरोप त्याने केला आहे. हल्ल्यानंतर रवीने मदतीसाठी घऱाबाहेर धाव घेतली. शेजा-यांनी पोलिसांना घटनेची माहिती देत, उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केलं. सर्जरी केल्यानंतर रवीला जयपूरच्या गोल्डन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. घटनेनंतर तरुणी आणि तिचे नातेवाईक फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Denial of marriage