मोदींच्या आसाम दौऱ्यात ‘आसू’ करणार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:49 AM2019-12-30T03:49:16+5:302019-12-30T06:38:31+5:30

ऑल इंडिया स्टुडंटस् युनियनने दिला इशाारा; १० जानेवारीला गुवाहाटीत पंतप्रधान येण्याची शक्यता

Demonstrations to be held in Assam during Modi's visit to Assam | मोदींच्या आसाम दौऱ्यात ‘आसू’ करणार निदर्शने

मोदींच्या आसाम दौऱ्यात ‘आसू’ करणार निदर्शने

Next

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० जानेवारी रोजी आसामच्या राजधानीत ‘खेलो इंडिया’चे उद्घाटन करण्यासाठी येतील तेव्हा मोठी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा ऑल इंडिया स्टुडंटस् युनियनने (आसू) दिला आहे.

आसूचे अध्यक्ष डी. कुमार नाथ यांनी सांगितले की, भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ जानेवारी रोजी गुवाहाटीत होणारी मॅच आणि १० ते २२ जानेवारीदरम्यान चालणाºया ‘खेलो इंडिया’ स्पर्धा यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानंतर पंतप्रधान मोदी हे प्रथमच राज्यात येण्याची शक्यता आहे. नवीन कायदा परत घ्यावा, अशी मागणी करतानाच आसूचे मुख्य सल्लागार एस. कुमार भट्टाचार्य म्हणाले की, या आंदोलनापासून लोकांचे लक्ष हटविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

योगी सरकारने अमानुषतेच्या मर्यादा ओलांडल्या : प्रियांका गांधी
उत्तर प्रदेश सरकारने अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी टष्ट्वीट केले आहे की, काँग्रेसच्या कार्यकर्त्या सदफ जफर यांच्यावर पोलिसांनी विनाकारण आरोप ठेवत तुरुंगात टाकले आहे.
सदफ यांचे दोन्ही मुले आपल्या आईची प्रतीक्षा करीत आहेत. या संवेदनहीन सरकारने मुलांना आईपासून, वृद्धांना मुलांपासून दूर ठेवले आहे. प्रियांका गांधी यांनी शनिवारी रात्री सदफ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सीएएचे समर्थन करणाºया आमदार बसपातून निलंबित
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन करणाºया बसपाच्या मध्यप्रदेशमधील आमदार रमाबाई यांना पक्षप्रमुख मायावती यांनी पक्षातून निलंबित केले आहे. आमदार रमाबाई यांनी पथरिया विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या एका कार्यक्रमात शनिवारी सीएएचे समर्थन केले होते. दरम्यान, अल्पसंख्याकांना ‘पाकिस्तान चालते व्हा’, अशी धमकी देणाºया पोलीस अधिकाºयाच्या भाषेचा निषेध करीत मायावती यांनी अधिकाºयाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

युथ काँग्रेसची निदर्शने
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करणाºया पोलिसांचा निषेध करीत युथ काँग्रेसने रविवारी उत्तर प्रदेश भवनाजवळ निदर्शने केली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दक्षिण दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात आसाम भवन ते उत्तर प्रदेश भवनकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. युथ काँग्रेसचे प्रभारी अमरीश रंजन पांडेय म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने नैतिक आणि सामाजिक अधिकार गमावला आहे.

तामिळनाडूत रांगोळी काढून केली निदर्शने : चेन्नईत रविवारी रांगोळी काढून सीएएविरोधात निदर्शने करणाºया महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. विनापरवानगी निदर्शने केली म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. या निदर्शकांनी रांगोळी काढून सीएएविरोधात घोषणाबाजी केली.

Web Title: Demonstrations to be held in Assam during Modi's visit to Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.