मॉडेल्सना भगव्या स्कार्फसह रोखले म्हणून शिवसेनेची ताजमहालसमोर निदर्शने
By Admin | Updated: April 22, 2017 21:01 IST2017-04-22T20:49:54+5:302017-04-22T21:01:50+5:30
प्रसिद्ध पर्यटनस्थळ ताजमहालमध्ये भगव्या वस्त्रांसह प्रवेश करण्यापासून रोखले म्हणून बजरंग दल आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी...

मॉडेल्सना भगव्या स्कार्फसह रोखले म्हणून शिवसेनेची ताजमहालसमोर निदर्शने
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 22 - प्रसिद्ध पर्यटनस्थळ ताजमहालमध्ये भगव्या वस्त्रांसह प्रवेश करण्यापासून रोखले म्हणून बजरंग दल आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी ताजमहालच्या समोर जोरदार निदर्शने केली. चार दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या मॉडेल्सना भगव्या वस्त्रासह ताजमहालमध्ये प्रवेश करण्यापासून तिथल्या काही कर्मचा-यांनी रोखले.
या मॉडेल्स खांद्यावर भगवी ओढणी घेऊन ताजमहालमध्ये प्रवेश करत असताना तिथे असणा-या काही जणांनी हटकले. भगवी ओढणी प्रवेशव्दारावर ठेवल्यानंतर त्यांना तामजहालमध्ये प्रवेश दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
या सक्ती विरोधात बजरंग दल, शिवसेना आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालच्या पूर्व प्रवेशव्दारावर शनिवारी दुपारी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ताजमहालमध्ये प्रवेश करताना कपडयांचे कोणतेही निर्बंध नाहीत असे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. सुपरमॉडेल इंटरनॅशनल स्पर्धेसाठी या मॉडेल्स भारतात आल्या आहेत. 12 एप्रिलपासून ही स्पर्धा सुरु होत आहे.