शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शिवसेनेसह १८ पक्षांची राज्यघटनादिनी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 04:53 IST

सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

नवी दिल्ली : सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, राज्यघटना ही सर्वोच्च असून तिच्या सर्व तरतुदींचे नीट पालन करायला हवे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. राज्यघटनेतील मूल्यांचा तसेच घटनात्मक संस्थांचा आदर करून त्यानुसार आपले वर्तन राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राज्यघटनेने भाषण व विचारस्वातंत्र्य हे मूलभूत हक्क बहाल केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व हिंसाचाराला दूर राखणे या जबाबदाऱ्याही नागरिकांवर सोपविल्या आहेत.रामनाथ कोविंद म्हणाले की, देशातील लोकशाही पद्धतीच्या कारभारासाठी राज्यघटना दीपस्तंभासारखे कार्य करते. भारतातील लोकशाहीचा जगभरात आदर केला जातो. १७ व्या लोकसभेमध्ये ७८ महिला खासदार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने महिला खासदार या सभागृहात आजवर कधीही निवडून आल्या नव्हत्या याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. राज्यघटना दिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीवर काँग्रेस, शिवसेनेसह अठरा पक्षांनी बहिष्कार घातला होता. या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद भवनाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमून मोदी सरकारच्या विरोधात मूक निदर्शने केली. त्या पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस, सप, द्रमुक, माकप, भाकप, आययूएमल, व्हीसीके आदी पक्षांचा समावेश होता. या निदर्शनांत बसप मात्र सहभागी झाली नव्हती.देशाचे स्वातंत्र्य धोक्यात घालू नका : नायडूसंप्रदायवादापासून देशाला दूर ठेवले पाहिजे, असे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. या विचारांच्या विपरीत वर्तन घडल्यास देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. नागरिकांमध्ये मूलभूत हक्कांविषयी लोकप्रतिनिधींनी जागृती निर्माण करावी, असेही ते म्हणाले.लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, घटनेतील तत्त्वांनुसार आपली कर्तव्ये बजावून खासदारांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. आपली कर्तव्ये नीट न बजावता नागरिक केवळ स्वत:च्या हक्कांबाबतच जागरूक राहिले तर त्यामुळे असंतुलन निर्माण होऊन त्याचा देशाच्या विकासावरही परिणाम होईल.जबाबदाऱ्यांकडेही लक्ष हवे : पंतप्रधानआजतागायत नागरिकांच्या हक्कांवरच जोर देण्यात येत असे; पण आता नागरिकांनी आपल्यावरील जबाबदाºयांवरही लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटना दिनानिमित्त संसदेच्या संयुक्त बैठकीत सांगितले. भारतीय राज्यघटनेने नागरिकांचे हक्क व कर्तव्ये काय आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले आहे.राज्यघटनेने नागरिकांवर सोपविलेली जबाबदारी कशी पूर्ण करता येईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनNew Delhiनवी दिल्ली