शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 06:33 IST

Demonetisation: नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा ८६ टक्के होत्या. मात्र, नोटाबंदी झाल्यानंतर ९८ टक्के नोटा जमा झाल्या. त्यामुळे नोटाबंदी ही काळे पैसे पांढरे करण्याचा एक मार्ग होता, असे माझे मत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - २०१६ मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या नोटाबंदीच्या विरोधात मी मत मांडले होते. नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा ८६ टक्के होत्या. मात्र, नोटाबंदी झाल्यानंतर ९८ टक्के नोटा जमा झाल्या. त्यामुळे नोटाबंदी ही काळे पैसे पांढरे करण्याचा एक मार्ग होता, असे माझे मत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी संविधानानुसार कर्तव्य न बजावणाऱ्या राज्यपालांवर टीकेचे आसूड ओढले.

नलसर विधि विद्यापीठात आयोजित संविधान परिषदेच्या उद्घाटन सत्रात न्यायमूर्ती नागरत्ना बोलत होत्या. भारत सरकारने ऑक्टोबर २०१६ मध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व काळा पैसा बँकेत परत आला. सामान्य माणसाला होत असलेल्या त्रासामुळे माझे मन हेलावून गेले होते. त्यामुळे मी नोटाबंदीच्या विरोधात मत दिले, असे न्यायमूर्ती म्हणाल्या.

महाराष्ट्राचे उदाहरण...राज्यपालांच्या अतिरेकीपणाचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या प्रकरणाबद्दल त्यांनी सांगितले. ‘एखाद्या राज्याच्या राज्यपालाची कृती न्यायालयांसमोर विचारार्थ आणणे ही राज्यघटनेनुसार निरोगी प्रवृत्ती नाही,’ असे त्यांनी म्हटले.

राज्यपालांना सांगावे लागणे खूप लाजिरवाणे- मला वाटते की, राज्यपालांच्या पदाला जरी ‘गव्हर्नर’ म्हटले जात असले, तरी ते एक गंभीर घटनात्मक पद आहे. राज्यपालांनी संविधानानुसार त्यांची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, जेणेकरून राज्यपालांविरुद्धच्या अशा प्रकारच्या खटल्यांना आळा बसेल. - राज्यपालांना एखादी गोष्ट करण्यास किंवा करू नये, असे सांगणे खूप लाजिरवाणे आहे, परंतु आता अशी वेळ आली आहे की, त्यांना आता संविधानानुसार कर्तव्य बजावण्यास सांगितले जाईल, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNote BanनोटाबंदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारblack moneyब्लॅक मनी