शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

नोटाबंदीत नव्हती ‘खोट’, सुप्रीम कोर्टाचा बहुमताने निर्वाळा; ५८ याचिका फेटाळल्या; केंद्राला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 06:55 IST

हा निर्णय कोणत्याही कायदेशीर वा घटनात्मक त्रुटीमुळे बाधित नसल्याचा निर्णय देताना कोर्टाने म्हणाले की, त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार यांच्यात ६ सहा महिने सल्लामसलत करण्यात आली होती.

 नवी दिल्ली : हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला सहा वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सोमवारी ४:१ अशा बहुमताने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. याच्या निर्णय प्रक्रियेत कोणताही दोष नव्हता, असेही स्पष्ट करीत निर्णयाला विरोध करणाऱ्या ५८ याचिका कोर्टाने फेटाळल्या. हा निर्णय कोणत्याही कायदेशीर वा घटनात्मक त्रुटीमुळे बाधित नसल्याचा निर्णय देताना कोर्टाने म्हणाले की, त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार यांच्यात ६ सहा महिने सल्लामसलत करण्यात आली होती.न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने कार्यकारिणीचे आर्थिक धोरण असल्याने हा निर्णय बदलता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत आर्थिक धोरणांच्या बाबतीत मोठा संयम असणे आवश्यक आहे आणि न्यायालय न्यायिक समीक्षण करू शकत नाही, अशी भूमिका मांडली. न्यायमूर्ती बी. आर. गवई, ए. एस. बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रमण्यन यांचा समावेश खंडपीठामध्ये होता. 

बहुमत असलेले न्यायमूर्ती काय म्हणाले?काळा पैसा नष्ट करणे, दहशतवादी फंडिंग आदी उद्दिष्टांशी याचा वाजवी संबंध होता आणि ती उद्दिष्टे साध्य झाली की नाही, याला काही अर्थ नाही. नोटाबंदीच्या नोटा कायदेशीर निविदांसह बदलण्यासाठी दिलेली ५२ दिवसांची सूट अवास्तव नव्हती आणि ती आता वाढवता येणार नाही.आरबीआय कायद्याच्या कलम २६ (२)अंतर्गत केंद्राकडे उपलब्ध असलेले अधिकार फक्त काही नोटांच्या मालिकेसाठी (सिरीज) मर्यादित ठेवता येणार नाहीत. आधीच्या दोन प्रसंगी नोटाबंदीचा निर्णय कायद्याद्वारे झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अधिसूचनेद्वारे हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणता येत नाही. नोटा बदलण्याचा कालावधी अवास्तव आहे, असे म्हणता येणार नाही. त्या कालावधीनंतर नोटा स्वीकारण्याचा स्वतंत्र अधिकार आरबीआयकडे नाही.

असहमत असलेल्या न्यायमूर्ती नागरत्ना काय म्हणाल्या? केंद्राच्या आदेशानुसार चलनी नोटांच्या संपूर्ण मालिकेची नोटाबंदी ही एक गंभीर समस्या आहे.आरबीआयने याचा स्वतंत्रपणे विचार केला नाही. फक्त मागवलेल्या मताला मध्यवर्ती बँकेची शिफारस आहे, असे म्हणता येणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया २४ तासांत झाली.केंद्र सरकारचे अधिकार विस्तृत आहेत. परंतु, त्यांचा वापर अधिसूचनेद्वारे नव्हे, तर कायद्याद्वारे केला पाहिजे. संसदेला अशा महत्त्वाच्या प्रकरणात बाजूला ठेवता येणार नाही. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चुकीचा आणि बेकायदा आहे.

नोटाबंदीनंतर चलनातील नोटा ८३%नी वाढल्या नोटाबंदीमुळे चलनातील नोटांचे प्रमाण कमी होण्याऐवजी नोटा ८३ टक्क्यांनी वाढल्या. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, नोटाबंदी आधी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात १७.७४ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा होत्या. ६ जानेवारी २०१७ रोजी ९ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा होत्या. २३ डिसेंबर २०२२ रोजी चलनातील नोटांचे मूल्य वाढून ३२.४२ लाख कोटी रुपये एवढे होते. 

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय