रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:18+5:302014-05-12T19:48:18+5:30

सावरवाडी : करवीर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेची ग्रामीण कामे बंद पडल्यामुळे जनतेत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी, रस्ते दुरुस्तीची कामे थंडावली गेली आहेद.

The demand for the work of employment guarantee scheme | रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी

रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी

वरवाडी : करवीर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेची ग्रामीण कामे बंद पडल्यामुळे जनतेत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी, रस्ते दुरुस्तीची कामे थंडावली गेली आहेद.
केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारी पानंदी रस्ते, सार्वजनिक गाव तलाव दुरुस्ती, मुख्य वाहतुकीचे रस्ते, आदी कामे बंद पडल्यामुळे ग्रामीण शेतमजुरांचे हाल होऊ लागले आहेत. रोजगार हमी योजनाच थंडावली गेली. गेल्या तीन चार वर्षांपूर्वी करवीर तालुक्यात जोरदार स्वरूपात सरकारी पानंदी दुरुस्तीची कामे सुरू होती.
शासकीय अधिकार्‍यांकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेचा शासकीय निधीही परत जाण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील महे, कोगे, बहिरेश्वर, वाशी, गणेशवाडी, बेरकळवाडी, सावरवाडी, कसबा बीड, हिरवले दुमाला, सडोली दुमाला, आदीं भागात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.
वार्ताहर.

Web Title: The demand for the work of employment guarantee scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.