स्त्री रुग्णालय मागणी पडली धुळखात गत वर्षभरात ३० हजार स्त्रीवर ग्रामीण रुग्णालयात झाले उपचार
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:12+5:302015-02-14T23:52:12+5:30
भोकर : मागील वर्ष भरात भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० हजार ८४ स्त्री उपचारासाठी आल्या होत्या. खाजगी दवाखान्यातील संख्या किंबहुना एवढीच आहे. अशा परिस्थिती स्त्रीसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची गरज आहे. पण या बाबीकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.

स्त्री रुग्णालय मागणी पडली धुळखात गत वर्षभरात ३० हजार स्त्रीवर ग्रामीण रुग्णालयात झाले उपचार
भ कर : मागील वर्ष भरात भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० हजार ८४ स्त्री उपचारासाठी आल्या होत्या. खाजगी दवाखान्यातील संख्या किंबहुना एवढीच आहे. अशा परिस्थिती स्त्रीसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची गरज आहे. पण या बाबीकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.मागील वर्ष भरात भोकर्या ग्रामीण रुग्णालयात ५९ हजार ६१० जणांची रुग्ण तपासणी झाली. यात ३० हजार ८४ स्त्री रुग्ण होत्या. विविध आजाराने ग्रस्त असलेल्या महिला खाजगी दवाखान्यात ही एवढ्या प्रमाणात उपचारासाठी जातात. स्त्रीयांचे वाढते आजार पाहता भोकर येथे स्त्री रुग्णालय व्हावी, अशी मागणी गत दहा वर्षापासून होत आहे. याबाबत ९ वर्षाखाली भोकर ग्रामपंचायतने स्त्री रुग्णालय उभारावे, यासाठी ठराव घेवून आरोग्य विभागाकडे मागणी केली होती. पण अद्याप पर्यंत भोकर येथे स्त्री रुग्णालयाल मंजुरी मिळाली नाही. गत वर्ष भरात ८५० स्त्रीयांनी ग्रामीण रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या पैकी चौघी जणांचे सिझरही झाले. १५२ स्त्री यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ४ हजार ९११ स्त्रीयावर दाखल करुन घेवून उपचार करण्यात आले. यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे, डॉ. एम.के. हत्ते, डॉ. एस.व्ही. जाधव, डॉ. बालाजी पोटे, डॉ. एस.जी. देगलूरकर, डॉ. आर.जी. आवर्दे, डॉ. एम.बी. आयनिले, परिसेविका एस.बी. राठोड, अधिपरिचारिका सुरेखा कोकाटे, वैशाली कुलकर्णी, ऐरयल केदासे, तृप्ती विधाते आणिता स्वामी, ज्योती शेंडगे, अतुल कांबळे यांनी स्त्री रुग्णावर उपचाराची जबाबदारी पार पाडली.स्त्री रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना भोकर येथे स्त्री रुग्णालयाची गरज आहे. पण या बाबीकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. भोकर येथे स्त्री रुग्णालय झाल्यास स्त्रीयांचा फार मोठा प्रश्न सुटणार आहे. चौकटस्वाईन फ्ल्यूची कार्यशाळा संपन्नभोकर येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूंची कार्यशाळा संपन्न झाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे यांनी तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना स्वाईन फ्ल्यू आजाराची माहिती दिली. घ्यावयाची काळजी व उपचाराबाबत मार्गदर्शन केल. यावेळी डॉ.एम.के. हत्ते, डॉ. उत्तम जाधव, डॉ. पारवेकर, डॉ. मारावार, डॉ. साईनाथ वाघमारे, डॉ. मुद्दपीत उद्दीन, डॉ. विनायक थोरवट, डॉ. फिरोजखान इनामदार, डॉ. इनामदार, डॉ. जाजू, डॉ. मुक्कनवार, डॉ. राम नाईक, डॉ. आडे, डॉ.वसंत राठोड यांची उपस्थिती