पाणीसाठे आरक्षित करण्याची मागणी निवेदन : भाजपाचे तहसीलदारांना साकडे
By Admin | Updated: December 14, 2014 00:10 IST2014-12-12T23:49:12+5:302014-12-14T00:10:39+5:30
चाकूर : दुष्काळी परिस्थिती जाणून तालुक्यातील सर्वच धरणातील पाणीसाठे आरक्षित करावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने गुरुवारी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे़

पाणीसाठे आरक्षित करण्याची मागणी निवेदन : भाजपाचे तहसीलदारांना साकडे
चाकूर : दुष्काळी परिस्थिती जाणून तालुक्यातील सर्वच धरणातील पाणीसाठे आरक्षित करावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने गुरुवारी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे़
चाकूर तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पातून जवळपास २६ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात नळेगाव, वडवळ नागनाथ, घरणी, सुगाव, देवंग्रा, हुडगेवाडी, हटकरवाडी, यलमवाडी आदी गावांचा समावेश आहे. परंतु, या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. या प्रकल्पात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस कमी झाला आहे़ त्यातच परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे़ या मध्यम प्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे सोडू नये़ तसेच घरणी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील अन्य तळे, साठवण तलावातील पाणी आरक्षित करावे, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सरचिटणीस ॲड. मनोज बिराजदार, माधवराव मुगे आदींच्या स्वाक्षर्या आहेत़