शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लगीनघाईत वाढली विवाह सेवांची मागणी; दिल्ली, मुंबईत सर्व सेवांसाठी सर्वाधिक मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 08:03 IST

मुंबई, दिल्ली व चेन्नई या शहरांमध्ये बँक्वेट हॉल्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला. दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमध्ये मेकअप आर्टिस्ट्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला.

मुंबई :  व्यवहार सुरळीत होत असताना विवाह सेवांच्या मागणी ४९.७ टक्क्यांनी वाढली. यात डीजेसाठी शोध दिल्लीमध्ये सर्वाधिक राहिला. त्यानंतर मुंबई व चेन्नईचा क्रमांक होता. दिल्ली, मुंबई व हैदराबाद या शहरांत वेडिंग प्लानर्ससाठी मागणी सर्वाधिक राहिली, असे एका संकेतस्थळाच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली.

मुंबई, दिल्ली व चेन्नई या शहरांमध्ये बँक्वेट हॉल्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला. दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमध्ये मेकअप आर्टिस्ट्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला. चेन्नई, दिल्ली व बंगळुरू या शहरांमध्ये वेडिंग ज्वेलरीसाठी मागणी सर्वोच्च राहिली. दिल्ली, हैदराबाद व मुंबई येथे वेडिंग बॅण्ड्ससाठी मागणीत वाढ झाली. काही नगरे व शहरांमधील मेकअप आर्टिस्ट्ससाठी शोध ४९ टक्क्यांनी वाढला, त्यात लखनऊ, चंदिगड व जयपूर या शहरांचा समावेश होता.

वेडिंग बॅण्ड्ससाठी मागणी १५२ टक्क्यांनी वाढली, यासंदर्भात लखनऊ, पटना व कानपूर अग्रस्थानी होते. फोटोग्राफर्सच्या संदर्भात लखनऊ, पटना व इंदोर मागणी वाढीमध्ये अग्रस्थानी होते. येथील शहरांमधील शोधांमध्ये ६७ टक्क्यांची वाढ झाली. पटना, जयपूर व लखनऊ येथे वेडिंग प्लानर्ससाठी मागणी उच्च होती. या शहरांमध्ये विशेष सेवांसाठी मागणी ३९ टक्क्यांनी वाढली. तर कोईम्बतूर व मदुराई, तसेच जयपूर या दक्षिणेकडील शहरांत वेडिंग ज्वेलरीसाठी मागणी सर्वाधिक होती.

काय आहे सर्वेक्षणात?एक हजार भारतातील शहरांमध्ये बँक्वेट हॉल्स, मेकअप आर्टिस्ट्स, वेडिंग फोटोग्राफर्स, वेडिंग बॅण्ड्स, वेडिंग ज्वेलरी, डीजे आणि वेडिंग प्लानर्स अशा विवाह सेवांच्या ग्राहकांच्या मागण्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. 

फुलांची मागणी वाढलीफुलांच्या मागणीचा विचार करता चंदिगड, विशाखापट्टणम व म्हैसूर येथे फूलविक्रेत्यांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला, तर एकूणच सर्व शहरांमधील विवाहासाठी फुलांची मागणी ३५ टक्क्यांनी वाढली.

पटना व लखनऊ येथे विवाहासंबंधित सर्व सेवांसाठी अधिक शोध घेण्यात आला. पटना, लखनऊ व गोरखपूरमध्ये बँक्वेट हॉलला सर्वाधिक मागणी होती. तर इंदोर, मंगळुरु व चंदिगड येथे केटरर्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला.

टॅग्स :marriageलग्न